नगर रचनाकारांची मक्तेदारी संपणार

By admin | Published: October 19, 2016 12:55 AM2016-10-19T00:55:13+5:302016-10-19T00:55:13+5:30

‘इज आॅन डुर्इंग बिझनेस’अंतर्गत बांधकाम परवानगी देताना पारदर्शकता आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

Municipal monopoly monopoly is over | नगर रचनाकारांची मक्तेदारी संपणार

नगर रचनाकारांची मक्तेदारी संपणार

Next


पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने ‘इज आॅन डुर्इंग बिझनेस’अंतर्गत बांधकाम परवानगी देताना पारदर्शकता आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये आता स्थळ पाहणी करूनच बांधकाम परवानगीसाठी प्रकरण दाखल करण्यात येत असून, यापुढे वेगवेगळ््या भागासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सहायक नगर रचनाकारांचे अधिकार संपुष्टात आणले आहेत. यामुळे हवेली किंवा अन्य कोणत्याही तालुक्यातील बांधकाम परवानग्या कोणा एका नगर रचनाकाराकडे न देता कोणतीही फाईल कोणाकडे मान्यतेसाठी देण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे.
याबाबत पीएमआरडीएने काढलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे, की आतापर्यंत विशिष्ट भौगोलिक क्षेत्र निहाय बांधकाम परवानगीसाठी आलेल्या प्रस्तावांची छाननी करण्याचे व परवानगी देण्याचे अधिकार सहायक नगर रचनाकार यांना दिली होती. परंतु यापुढे प्रस्तावाची परवानगी देण्याचा व छाननी करण्याची जबाबदारी त्या सहायक नगर रचनाकारांकडे प्रलंबित कामाचा आढावा घेऊन करण्यात येणार आहे. यामध्ये कोणत्या एका भागासाठी सहायक नगर रचनाकारांची असलेली मक्तेदारी संपुष्टात येणार आहेत. यासाठी समन्वय साधण्यासाठी योगेश पवार या लिपिकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Municipal monopoly monopoly is over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.