महापालिका मालामाल, १२० कोटींचा करभरणा
By Admin | Published: November 12, 2016 04:24 AM2016-11-12T04:24:02+5:302016-11-12T04:24:02+5:30
५०० आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटांद्वारे नागरिकांना करभरणा करण्याची सवलत मिळताच महापालिका मालामाल झाल्या.
मुंबई : ५०० आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटांद्वारे नागरिकांना करभरणा करण्याची सवलत मिळताच महापालिका मालामाल झाल्या. अवघ्या दहा तासांत तब्बल १२० कोटी रुपयांचा कर जमा झाला. सरकारनेही १४ नोव्हेंबरपर्यंत यास मुदतवाढ दिली.
जुन्या नोटांद्वारे कर भरण्याची सवलत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यापासून कर भरण्यास झुंबड उडाली. कर भरण्याचा आकडा आणखी वाढत जाईल, असा अंदाज नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी वर्तविला.
कुठे मिळाला किती कर?
पुणे ३६ कोटी रुपये, उल्हासनगर ११ कोटी, नागपुरात ४.५६ कोटी, नाशिकमध्ये १३ कोटी, जळगावमध्ये एक कोटी, मुंबईत १३ कोटी, नवी मुंबई ३.५० कोटी, कल्याण-डोंबिवली १४ कोटी, मीरा-भार्इंदर ६ कोटी, ठाणे ९ कोटी वसई-विरार ४.४ कोटी, नांदेड ३.३० कोटी, पिंपरी-चिंचवड ११ कोटी, नाशिक ३.५० कोटी, अहमदनगर १.३५ कोटी अशी रक्कम भरण्यात आली. सोलापूरच्या महापौर सुशीला आगुटे यांनी स्वत:कडील कराची थकबाकी भरली. राज्यातील नगरपालिकांमध्ये २० कोटी रुपयांहून अधिक रुपयांचा कर जमा झाला.