गरिबीला कंटाळून केली मुलाची हत्या

By Admin | Published: June 29, 2016 01:47 AM2016-06-29T01:47:33+5:302016-06-29T01:47:33+5:30

मुलाचा सांभाळ करण्यासाठी आणि त्याच्या औषधांसाठी पैसे नसल्याने आईनेच पोटच्या मुलाची गळा आवळून हत्या केली.

The murder of a child by bitter poverty | गरिबीला कंटाळून केली मुलाची हत्या

गरिबीला कंटाळून केली मुलाची हत्या

googlenewsNext


मुंबई : मुलाचा सांभाळ करण्यासाठी आणि त्याच्या औषधांसाठी पैसे नसल्याने आईनेच पोटच्या मुलाची गळा आवळून हत्या केली. सोमवारी पहाटे ही घटना चेंबूरच्या सिंधी कॉलनी परिसरात घडली. आरसीएफ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत मुलाच्या आईला अटक केली आहे.
देवराज दुरनाले (६) असे या मृत चिमुरड्याचे नाव आहे. तो आई सवितासह राहत होता. मूळची कर्नाटक येथील राहणारी ही महिला १० वर्षांपूर्वी मुंबईत राहण्यास आली. तिचा पती मजुरीचे काम करत होता. ही महिला घरकाम करून मुलांचा सांभाळ करत होती. सहा वर्षांपूर्वी तिच्या दोन मुलींचा आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर, पतीचेदेखील आजाराने निधन झाले. तेव्हापासून ती आणि मुलगा दोघेच चेंबूर कॉलनीत राहत होते.
बेताची आर्थिक परिस्थिती, तसेच सर्व पगार भाडे भरण्यासाठीच जात होता. त्यामुळे दोघांना काही वेळा उपाशीच झोपावे लागत होते. महिन्याभरापूर्वी घर मालकाने घरभाडे वाढवले होते. मिळणाऱ्या पगारात हे वाढीव भाडे परवडणारे नसल्याने तिने ही बाब तिच्या ओळखीतल्या एका रिक्षाचालकाला सांगितली.
त्याने तिची एका महिलेशी ओळख करून दिली. ती महिलादेखील त्याठिकाणी एकटीच राहत असल्याने, तिने तत्काळ तिला सोबत राहण्यासाठी होकार दिला. त्यानुसार, गेल्या आठ दिवसांपासून ही आरोपी महिला तिच्या मुलासह या महिलेकडे राहत होती. देवराजला फिट्स येत असल्याने, त्याला अनेकदा रुग्णालयात दाखल करावे लागत होते. मुलाच्या उपचारासाठी या महिलेने अनेकांकडून पैसेदेखील उसनवारीने घेतले होते. या सगळ््या प्रकाराला ही महिला कमालीची वैतागली होती.
रविवारी रात्री तिच्यासोबत राहणारी महिला कामावर गेली असताना, तिने मुलाला ठार मारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, तिने ओढणीच्या साहाय्याने देवराजची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर, त्याचा मृत्यू हा नैसर्गिक झाल्याचा बनाव तिने केला. यासाठी तिने मुलाला शताब्दी रुग्णालयात दाखल केले.
ही बाब आरसीएफ पोलिसांना समजताच त्यांनी तत्काळ रुग्णालयात जाऊन मृतदेहाची पाहाणी केली. तेव्हा मुलाच्या मानेवर काही जखमा पोलिसांना आढळून आल्या. शवविच्छेदन अहवालामध्येदेखील मुलाचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी सविताला ताब्यात घेतले. तिच्याकडे अधिक चौकशी केली असता, आपणच मुलाची हत्या केल्याचे तिने पोलिसांकडे कबूल केले. त्यानुसार, पोलिसांनी या महिलेस अटक केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The murder of a child by bitter poverty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.