शेळके खूनप्रकरणी कोठडीत वाढ

By admin | Published: November 5, 2016 01:35 AM2016-11-05T01:35:31+5:302016-11-05T01:35:31+5:30

तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या खूनप्रकरणी आठ आरोपींच्या पोलीस कोठडीत वडगाव न्यायालयाने आज वाढ केली

The murder of the goat | शेळके खूनप्रकरणी कोठडीत वाढ

शेळके खूनप्रकरणी कोठडीत वाढ

Next


तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या खूनप्रकरणी आठ आरोपींच्या पोलीस कोठडीत वडगाव न्यायालयाने आज वाढ केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.
रुपेश सहादू घारे (वय २५, रा. महागाव, ता. मावळ), राजेश दादाभाऊ ढवळे (वय ३०, रा. रुपीनगर, तळवडे, ता. हवेली), शिवाजी भरत आढाव (वय २४), अमित अनिल दाभाडे (वय २३ दोघेही रा. काले कॉलनी, पवनानगर, ता. मावळ), सचिन लक्ष्मण ठाकर ( वय २६, रा. ठाकूरसाई , ता. मावळ) या पाच आरोपींच्या पोलीस कोठडीत सहा नोव्हेंबरपर्यंत वडगाव न्यायालयाने वाढ केली आहे.
पिंट्या ऊर्फ बाळू दत्तात्रय सांडभोर ( वय ३३, रा. कोटेश्वरवाडी, ता. मावळ ), सूरज विलास गायकवाड (वय २२ , रा. ठाकरवाडी, इंदोरी), नितीन शिवाजी वाडेकर ( वय २२, रा. भांबोली, ता. खेड ) या तीन आरोपींना ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश वडगाव न्यायालयाने दिले आहेत. या आठही आरोपींची पोलीस कोठडीची मुदत आज संपली असल्याने त्यांना वडगाव न्यायालयापुढे हजर केले असता, न्यायालयाने या सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ सुनावली
आहे. (वार्ताहर)
>पूर्ववैमनस्याच्या कारणावरून श्याम दाभाडे व त्याच्या साथीदारांनी रविवारी सकाळी (दि. १६ आॅक्टोबर) येथील खांडगे पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावर सचिन शेळके यांची गोळ्या घालून व धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृण हत्या केली. श्याम दाभाडेसह त्याचे काही साथीदार फरार आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक वसंत बाबर करीत आहेत.

Web Title: The murder of the goat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.