लग्नासाठी तगादा लावणा-या प्रियसीचा केला खून

By Admin | Published: June 24, 2016 10:13 PM2016-06-24T22:13:51+5:302016-06-24T22:13:51+5:30

चिकलठाणा गायरानमधील आठवडी बाजारालगतच्या नाल्यात १६ जून रोजी जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या खुनाचे गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना शुक्रवारी

The murder of a lover of marriage | लग्नासाठी तगादा लावणा-या प्रियसीचा केला खून

लग्नासाठी तगादा लावणा-या प्रियसीचा केला खून

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २४ - चिकलठाणा गायरानमधील आठवडी बाजारालगतच्या नाल्यात १६ जून रोजी जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या  महिलेच्या खुनाचे गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना शुक्रवारी यश आले. चंदा अनिल अंभोरे (३५, ह. मु. जयभवानीनगर, मूळ  रा. चंदनझिरा, जालना) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. शैलेश अजय बेंजामीन (२५, रा. सिडको एन-६) याच्यासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाºया चंदाने लग्नासाठी सारखा तगादा लावला होता. ‘ती’ नको असल्यानेच शैलेशने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह चिकलठाणा गायरानात  पेट्रोल टाकून जाळल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अखेर शैलेशला अटक केली. 
याविषयी अधिक माहिती देताना पोलीस उपायुक्तराहुल श्रीरामे यांनी सांगितले की, १६ जून रोजी सकाळी चिकलठाणा गायरानमध्ये एका अनोळखी महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह  आढळला होता. मृताची ओळखही पटलेली नव्हती आणि औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील हरवलेल्या महिलांचे वर्णनही या महिलेशी जुळत नव्हते. त्यामुळे या खुनाचे गूढ उकलणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मृताची ओळख पटावी, यासाठी पोलीस युद्धपातळीवर प्रयत्न करीत होते. शिवाय खबºयालाही पोलिसांनी कामाला लावले होते. अखेर जयभवानीनगर येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणारी चंदा अंभोरे ही बेपत्ता असल्याचे खबºयाने पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी तिचा प्रियकर शैलेश बेंजामीन असल्याची माहिती समोर आली. मग पोलिसांनी शैलेशचा शोध सुरू केला. तो टॅक्सी कार चालवीत असे. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शैलेशला पोलिसांनी उचलले. त्यानंतर त्यास पोलिसी खाक्या दाखवून चौकशी सुरू केली. आधी आपल्याला काहीच माहीत नाही म्हणणाºया शैलेशने अखेर तोंड उघडले.  चंदासोबत आपण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे सांगत त्याने तिच्या खुनाचीही कबुली दिली.  
लग्न करण्याचा आग्रह बेतला जिवावर...
 शैलेशने चंदाला जयभवानीनगर येथे रूम भाड्याने घेऊन दिली होती. माझ्याशी लग्न कर आणि मला पत्नीचे स्थान दे यासाठी चंदा ही शैलेशकडे सतत आग्रह धरीत होती. शैलेशचे चार वर्षांपूर्वी पहिले लग्न झालेले आहे. मात्र पत्नीसोबत त्याचा वाद सुरू आहे. पहिल्या पत्नीकडून घटस्फोट घेतल्याशिवाय  दुसरे लग्न शक्य नाही. तसेच लहान बहिणीचेही लग्न करायचे असल्याने सध्या आपण लिव्ह इनमध्येच राहू, असे तो सांगत होता.परंतु चंदा काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती त्याच्याकडे सतत पैशाचीही मागणी करीत होती. शैलेशच्या बहिणीचा २२ जून रोजी साखरपूडा होता. या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी पैसा लागणार असल्याने सध्या तुला पैसे देता येणार नाही,असे शैलेशने तिला सांगितले होते. १५ जून रोजी दुपारी शैलेश जयभवानीनगर येथे मृताच्या घरी गेला त्यावेळी  तिने पुन्हा लग्नाचा विषय काढला आणि पैशासाठी तगादा लावला.यावेळी त्यांच्यात जोरदार भांडण झाले आणि रागाच्या भरात शैलेशने तिचा गळा आवळून खून केला. तिला खाटावर झोपवून तो तेथून निघून गेला. रात्री ९ ते ९.३० वाजेच्या सुमारास चंदाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने त्याने एका पेट्रोलपंपावरुन अडीचशे  रुपयांचे पेट्रोल कॅनमध्ये घेतले. त्यानंतर तो जयभवानीनगरला आला. गुपचूप अंधारात कारमध्ये चंदाचा मृतदेह  टाकून त्याने चिकलठाणा गायरानातील आठवडी बाजाराजवळील नाला गाठला. तेथे कुणीही नव्हते. मग शैलेशने प्रेत कारमधून ओढत ओढत नाल्यात  आणले आणि त्यावर पेट्रोल टाकून पेटवून देत धूम ठोकली, असे तपासात समोर आल्याचे उपायुक्त श्रीरामे यांनी सांगितले. हा गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी सिडको एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी, झोन पथकाचे फौजदार नेताजी गंधारे, कर्मचारी विक्रम वाघ, राम अत्तरगे,राठोड आणि राजू पवार यांनी केले. हा अवघड गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल या पथकाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तातडीने ५० हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले. 
 
खुनानंतर चंदाच्या मुलीला आजीकडे नेऊन सोडले... 
आरोपी शैलेशने चंदाचा खून केला. त्यावेळी तिची पहिल्या पतीपासून झालेली आठ वर्षीय मुलगी तेथेच होती. मग आरोपी शैलेशने तिला उचलले आणि चंदाचे आई- वडील राहत असलेल्या चंदनझिरा या गावी घेऊन गेला. चंदाच्या आई- वडिलांच्या घरापासून काही अंतरावर त्याने मुलीला गाडीतून उतरविले आणि ‘ते तुझ्या आजीचे घर आहे. जा तेथे’ असे सांगून त्याने तिला सोडले व तो माघारी आला. नंतर त्याने तिच्या प्रेताची विल्हेवाट लावली, असे तपासात समोर आले आहे. 
 
लग्नासाठी पोलीस ठाण्यात धाव
विशेष म्हणजे शैलेश लग्न करण्यास टाळाटाळ करीत असल्याने चंदाने थेट पोलिसांकडे धाव घेतली होती. काही दिवसांपूर्वी तिने पुंडलिकनगर चौकी आणि पोलीस उपायुक्त कार्यालयात तक्रार अर्ज दिला होता; परंतु खाजगी प्रकरण असल्याने पोलिसांनी त्यावेळी त्यात फारसारसघेतलानाही.

Web Title: The murder of a lover of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.