मध्यप्रदेशातील शस्त्रास्त्र तस्करीतील फरारीला पुण्यात अटक
By admin | Published: August 3, 2016 08:06 PM2016-08-03T20:06:19+5:302016-08-03T20:06:19+5:30
शस्त्र तस्करीप्रकरणी मध्यप्रदेश पोलिसांकडून शोध घेण्यात येत असलेल्या दोघाजणांना दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यामध्ये जेरबंद केले असून या दोघांनाही मध्यप्रदेश पोलिसांच्या
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ३ - शस्त्र तस्करीप्रकरणी मध्यप्रदेश पोलिसांकडून शोध घेण्यात येत असलेल्या दोघाजणांना दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यामध्ये जेरबंद केले असून या दोघांनाही मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी मंगळवारी येरवडा भागातील सादलबाबा दर्ग्याजवळ ही कारवाई केली.
रोहन ऊर्फ दुध्या सुभाष चव्हाण (वय 29, रा. दारुवाला पुल, सोमवार पेठ), अखिल ऊर्फ ब्रिटीश अनिल पालांडे (वय 21, रा. माणिक कॉलनी, लोहगाव रस्ता, धानोरी) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुध्या आणि ब्रिटीश हे दोघे तिस-या साथीदारासह मध्यप्रदेशातील बडवानी भागात शस्त्र तस्करी करीत होते. मध्यप्रदेश पोलिसांना याची कुणकुण लागताच त्यांनी कारवाई करीत सुमीत मिलींद चव्हाण (रा. पुणे) याला अटक केली. मात्र, दुध्या आणि ब्रिटीश हे दोघे पसार होण्यात यशस्वी झाले होते. पोलिसांनी सुमीत कडून देशी बनावटीची आठ पिस्तुले जप्त केली होती.
मध्यप्रदेश पोलिसांनी याची माहिती पुणे पोलिसांनाही दिली होती. दरम्यान, एटीएसचे पोलीस हवालदार सुनिल पवार यांना आरोपी सादलबाबा दर्ग्याजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एटीएसचे उपायुक्त सुनिल कोल्हे, सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक महेंद्र काळडोके, सुनिल पवार, योगेश कुंभार, मोहन डोंगरे, प्रशांत धुमाळ यांनी सापळा लावून आरोपींना पकडले. या दोघांनाही मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.