मरेकडून मुंबई ते करमाळी १२ हिवाळी विशेष ट्रेन!
By Admin | Published: December 19, 2015 02:18 AM2015-12-19T02:18:13+5:302015-12-19T02:18:13+5:30
मध्य रेल्वेकडून मुंबई ते करमाळीदरम्यान ट्रेनच्या १२ विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. एलटीटी आणि सीएसटीहून या ट्रेन सोडण्यात येतील.
मुंबई : मध्य रेल्वेकडून मुंबई ते करमाळीदरम्यान ट्रेनच्या १२ विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. एलटीटी आणि सीएसटीहून या ट्रेन सोडण्यात येतील.
२५ डिसेंबर व १ जानेवारी रोजी एलटीटीहून ट्रेन नंबर 0१00५ तर ट्रेन नंबर 0१00६ याच दिवशी सोडण्यात येईल. एक एसी फर्स्ट क्लास, दोन एसी टू टायर, आठ एसी थ्री टायर आणि एक पेन्ट्री असेल. २६ डिसेंबर रोजी ट्रेन नंबर 0१0८९ /0१0९0 सीएसटी-करमाळी सोडण्यात येणार आहे. या ट्रेनला एक एसी टू टायर, दोन एसी थ्री टायर, सात स्लीपर क्लास जोडण्यात येणार आहेत. २७ डिसेंबर रोजी ट्रेन नंबर 0१00१/0१00२ सीएसटी-करमाळी-सीएसटी ट्रेन सोडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ट्रेन नंबर 0१0३९/0१0४0 एलटीटी-करमाळी-एलटीटी २२ डिसेंबर रोजी, २३ डिसेंबर रोजी ट्रेन नंबर 0१0४३/0१0४४ एलटीटी-करमाळी-एलटीटी ट्रेन सोडण्यात येइल.