छेडखानीच्या वादातून गुंडाची हत्या

By admin | Published: October 5, 2014 02:22 AM2014-10-05T02:22:57+5:302014-10-05T02:33:00+5:30

अकोला येथे छेडखानीच्या वादातून निर्घृण हत्या ; तीन संशयीत अटकेत.

The murder of the punk by the raid | छेडखानीच्या वादातून गुंडाची हत्या

छेडखानीच्या वादातून गुंडाची हत्या

Next

अकोला : छेडखानीच्या वादातून गुंड प्रवृत्तीचा सारंग अशोक गायकवाड (२२) याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी अकोल्यात घडली.
अकोल्यातील बाळापूर नाक्यावरील भारती प्लॉटमधील सारंग गायकवाड हा सकाळी त्याच्या एका मित्राकडे गेला होता. तेथून तो डाबकी रोडवरील मास्टर पॉवर जिमजवळ आला. या ठिकाणी वानखडेनगरातील अभिषेक खरसाळे, संतोष चितोडे आणि सोपीनाथनगरातील निखिल सहारकर एकत्र आले. त्यावेळी सारंग गायकवाड याने चाकूने निखिल सहारकर याच्यावर हल्ला चढविला. निखिलने त्याचा चाकू हातात पकडून, सारंगची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु सारंगने त्याला पुन्हा चाकू मारण्याचा प्रयत्न केला. ते पाहून आरोपींनी सारंगच्या डोक्यात दगडी फरशी घालून, त्याच्यावर चाकूने वार केले. सारंग रक्ताच्या थारोळय़ात पडल्यानंतर, आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेची माहिती मास्टर पॉवर जिममधील युवकांना समजल्यावर त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यांनी सारंगला तातडीने रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

** मृतकावर अनेक गंभीर गुन्हे
सारंग गायकवाड हा कुख्यात गुंड होता. २७ जुलै २0१२ रोजी किरकोळ वादातून त्याने हरिहरपेठेतील सचिन सुरेश हिवराळे (१९) याला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मार्च २0१३ मध्ये त्याने युवतीची छेड काढली होती. त्यावरून वाद झाला होता. या वादात सारंगने डाबकी रोडवरील युवकांना मारहाण केली होती.

** तिघे जण ताब्यात
आरोपींनी हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. आरोपी मोटारसायकलने पळून जाण्याच्या बेतात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी अभिषेक खरसाळे, निखिल सहारकर, संतोष चितोडे यांच्या मोटारसायकलचा पाठलाग करून त्यांना देवरी फाट्याजवळ पकडले. तिघांनीही सारंगची हत्या केल्याची कबुली दिली.

Web Title: The murder of the punk by the raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.