मुलीच्या प्रेमप्रकरणातून प्रियकराच्या बहिणीची हत्या
By Admin | Published: February 25, 2017 04:38 AM2017-02-25T04:38:44+5:302017-02-25T04:38:44+5:30
आपल्या अल्पवयीन मुलीच्या प्रेमप्रकरणातून वडिलाने तिच्या प्रियकराच्या बहिणीची हत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. हिंगणघाट पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पित्याला अटक केली आहे.
हिंगणघाट : आपल्या अल्पवयीन मुलीच्या प्रेमप्रकरणातून वडिलाने तिच्या प्रियकराच्या बहिणीची हत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. हिंगणघाट पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पित्याला अटक केली आहे.
रामदास ऊर्फ गोविंदा सहारे (५०) याच्या १६ वर्षीय मुलीचे येथील कल्पेश ऊर्फ चुहा बुरडकर याच्याशी प्रेमसंबध होते. याची माहिती समजल्यानंतर मुलीच्या भावाने कल्पेशला मारहाण केली. त्यात कल्पेश जखमी झाली. कल्पेशची बहीण वैशाली कुंटलवार (३५) ही सहारे यांच्या घरी मारहाणीबाबत विचारणा करण्याकरिता गेली होती. कल्पेशचा भाऊ रूपेशही तिथे गेला. यावेळी वैशाली व सहारेच्या मुलात वाद झाला. या वादात रामदास सहारे याने शस्त्राने रूपेशच्या कमरेवर वार केला. यात तो जखमी झाला. त्याला वाचविण्यासाठी वैशाली मधे आली असता सहारे याने तिच्यावरही वार केला. यात वैशाली गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी रामदासला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)