दोनशे रुपयांसाठी दोघांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 03:54 AM2017-07-27T03:54:11+5:302017-07-27T03:54:14+5:30

दोनशे रुपयांच्या वादातून दोघांचे दगडाने डोके ठेचून हत्या केल्याचा प्रकार ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे येथील पुलाखाली घडला आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या तिसºया साथीदाराचा शोध घेऊन अटक केली आहे

Murder for two hundred rupee | दोनशे रुपयांसाठी दोघांची हत्या

दोनशे रुपयांसाठी दोघांची हत्या

Next

नवी मुंबई : दोनशे रुपयांच्या वादातून दोघांचे दगडाने डोके ठेचून हत्या केल्याचा प्रकार ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे येथील पुलाखाली घडला आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या तिसºया साथीदाराचा शोध घेऊन अटक केली आहे. तिघेही बिगारी कामगार असून मंगळवारी रात्री दारू पिण्यासाठी पुलाखाली जमले होते.
ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे येथील उड्डाण पुलाखाली दोघांचे मृतदेह आढळून आले होते. सकाळी ७.३०च्या सुमारास रहदारी सुरू झाली असता, काही पादचाºयांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता, दोघांचेही डोके दगडाने ठेचून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी याप्रकरणी अधिक चौकशी केली असता, त्यांची ओळख पटली. बाळा उर्फ संदीप गायकवाड (२२) व समीर शेख (२०), अशी दोघा तरुणांची नावे असून ते तुर्भे परिसरातील झोपडपट्टीत राहणारे आहेत. तर घटनास्थळाची हद्द निश्चित झाल्यानंतर सानपाडा पोलीसठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शिवाय, या दुहेरी हत्याकांडाची उकल करण्याच्या अनुषंगाने परिमंडळ उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी पोलिसांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार सानपाडा व तुर्भे
पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. यादरम्यान मयत गायकवाड व शेख विषयी चौकशी करताना त्यांच्या प्रभाकर धोत्रे या तिसºया साथीदाराची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या शोधाकरिता पोलिसांनी झोपडपट्टी परिसर पिंजून काढला. त्यावेळी पळण्याच्या प्रयत्नात असताना त्याला अटक करण्यात आली.

घटनेच्या दोन दिवस अगोदर दोनशे रुपयांवरून प्रभाकर धोत्रे याचे गायकवाड व शेख याच्यासोबत भांडण झाले होते. यामुळे दोघांचाही काटा काढण्याचे धोत्रे याने ठरवले होते. यानुसार मंगळवारी रात्री पुलाखाली एकत्र दारू पिल्यानंतर दोघे जण झोपले असता, धोत्रे याने त्यांच्या डोक्यात दगड घालून हत्या केली.

तिघेही बिगारी कामगार असून मंगळवारी रात्री दारू पिण्यासाठी पुलाखाली जमले होते. पोलिसांनी ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे येथील उड्डाण पुलाखाली पाहणी केली असता, दोघांचेही डोके दगडाने ठेचून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: Murder for two hundred rupee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.