महिला डॉक्टरचा खून उघडकीस

By admin | Published: May 8, 2016 02:12 AM2016-05-08T02:12:51+5:302016-05-08T02:12:51+5:30

‘गर्लफ्रेंड’बरोबर असलेल्या संबंधात आड येणाऱ्या डॉक्टर पत्नीचा खून करून पुरावा नष्ट करणाऱ्या डॉक्टरचा प्रकार एका निनावी पत्राद्वारे गुन्हे शाखेच्या एका पथकाने उघडकीस

The murder of a woman doctor | महिला डॉक्टरचा खून उघडकीस

महिला डॉक्टरचा खून उघडकीस

Next

सोलापूर : ‘गर्लफ्रेंड’बरोबर असलेल्या संबंधात आड येणाऱ्या डॉक्टर पत्नीचा खून करून पुरावा नष्ट करणाऱ्या डॉक्टरचा प्रकार एका निनावी पत्राद्वारे गुन्हे शाखेच्या एका पथकाने उघडकीस आणला आहे. डॉ. रश्मी अग्रहार (रा. नीलमोहर अपार्टमेंट, अंत्रोळीकर नगर, होटगी रोड, सोलापूर) हिच्या खूनप्रकरणी पती डॉ. प्रसन्ना, त्याची गर्लफ्रेंड मेघरॉय चौधरी यांच्यासह तिघा डॉक्टरांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.
डॉ. रश्मी हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा एक निनावी अर्ज पोलीस आयुक्तांना मिळाला. त्यानुसार तपास करून पोलीसांनी डॉक्टर पतीचे बिंग फोडले.
डॉ. प्रसन्ना अग्रहार आणि मेघरॉय चौधरी यांच्यात अनैतिक संबंध होते. पतीच्या या कृत्यास डॉ. रश्मी यांचा प्रखर विरोध होता. त्यातूनच २६ मे ते १ जून २०१५ या कालावधीत डॉ. प्रसन्ना यांनी पत्नी डॉ. रश्मी यांच्या खुनाचा कट रचला. ९ जुलै २०१५ रोजी रात्री साडेबारा वाजता तिचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब श्ािंदे यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली असून, सर्व आरोपींवर भादंवि कलम ३०२, १२० (ब), २०१, १७७, ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)

नगरमधील हॉस्पिटल विकले
अहमदनगरमध्ये डॉ. प्रसन्ना अग्रहार याचे हॉस्पिटल होते. तेथेही डॉ. प्रसन्ना याने अनेक भानगडी केल्या. नगर शहरात वादग्रस्त ठरल्यानंतर तेथील हॉस्पिटल विकून त्याने सोलापूर गाठले आणि रामवाडी परिसरातील गंगामाई हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळवली. हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. एस. प्रभाकर हे त्याला दरमहा ४ लाख रुपये वेतन देत होते.

हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा बहाणा
पत्नीचा खून केल्यानंतर डॉक्टर पतीने डॉ. प्रभाकर, डॉ. भाऊसाहेब गायकवाड, डॉ. अमित कुलकर्णी यांना घरी बोलावून घेतले. डॉ. रश्मीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे तिघा डॉक्टरांना सांगितले. त्याच रात्री मोदी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीत तिच्यावर अंत्यसंस्कार करून पुरावा नष्ट केला.

तपास पथके रवाना
आरोपी डॉ़ प्रसन्न याचा शोध घेण्यास पोलीस तपास पथके रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले़

Web Title: The murder of a woman doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.