‘त्या’ तरुणीचा खून एकतर्फी प्रेमातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 04:15 AM2017-08-02T04:15:48+5:302017-08-02T04:15:51+5:30

पामबीच रोडवर सोमवारी पोलिसांना मरियम शेख या तरुणीचा मृतदेह आढळला होता. या खून प्रकरणाचा १२ तासांत उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

'The murder of a' woman 'in love with one-sided love | ‘त्या’ तरुणीचा खून एकतर्फी प्रेमातून

‘त्या’ तरुणीचा खून एकतर्फी प्रेमातून

Next

नवी मुंबई : पामबीच रोडवर सोमवारी पोलिसांना मरियम शेख या तरुणीचा मृतदेह आढळला होता. या खून प्रकरणाचा १२ तासांत उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी इम्रान खुद्देश सलमानीला अटक केली असून, एकतर्फी प्रेमातून हा खून केल्याची कबुली त्याने दिली आहे.
करावे गावामध्ये राहणाºया महेंद्र तांडेल यांना सोमवारी सकाळी १० वाजता पामबीच रोडवर एक बॅग बेवारस स्थितीमध्ये आढळून आली. बॅगेच्या बाजूच्या पाण्यामध्ये रक्त मिसळले असल्याचे निदर्शनास आल्याने, तांडेल यांनी बॅगेचे तोंड उघडून पाहणी केली असता, तरुणीचा मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याविषयी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. एनआरआय पोलीस स्टेशनमधील हवालदार नरवडे यांनी मयत महिलेला ओळखले. सीवूड सेक्टर-४४ मधील ग्रेसफुल हेअर कटिंग सलूनमध्ये ती काम करत असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. त्या महिलेचे नाव मरियम अब्दुल रहिम शेख असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी सलूनमधील सीसीटीव्हींची तपासणी केली असता, येथे काम करणाºया इम्रान सलमानी या तरुणाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. चौकशीदरम्यान त्याच्या गळ्यावर, कपाळावर ओरखडे आढळून आले. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर,त्याने खून केल्याची कबुली दिली
दोघांचे भांडण-
आरोपी इम्रान मयत मरियमवर एकतर्फी प्रेम करत होता, परंतु तिचा दुसºया मुलाबरोबर साखरपुडा झाल्याने त्याला राग आला होता. तिला लग्नासाठी आग्रह करू लागल्याने दोघांमध्ये भांडण झाले होते. या भांडणातून त्याने गळा दाबून तिचा खून केला. पोलिसांना सापडू नये, यासाठी युवतीच्या शरीराचे तुकडे करून ते बॅगमध्ये भरले व पामबीच रोडवर टाकून दिले होते. या गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सहआयुक्त प्रशांत बुरडे, परिमंडळ-एकचे उपआयुक्त सुधाकर पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, अशोक फल्ले, भूषण कापडणीस, पोलीस हवालदार विष्णू नरवाडे, दीपक सावंत, सुधीर पाटील यांनी केला आहे.

Web Title: 'The murder of a' woman 'in love with one-sided love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.