अंधेरीत तरुणाची हत्या

By admin | Published: May 16, 2016 04:33 AM2016-05-16T04:33:46+5:302016-05-16T04:33:46+5:30

अंधेरीत एका तरुणाची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह नाल्यात फेकून दिल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

The murder of the young man in the dark | अंधेरीत तरुणाची हत्या

अंधेरीत तरुणाची हत्या

Next

मुंबई : अंधेरीत एका तरुणाची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह नाल्यात फेकून दिल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. मृत व्यक्तीची ओळख पटली नसून या प्रकरणी डी.एन. नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अंधेरी पश्चिमेकडील कुकरेज मैदानाच्या शेजारील नाल्यात शनिवारी हा मृतदेह सापडला.
त्याच्या अंगावर धारदार शस्त्राने वार करत त्याची गळा आवळून
हत्या करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच डी.एन. नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी त्याची माहिती सर्व पोलीस ठाण्यांत पाठविण्यात आली आहे. विविध पोलीस ठाण्यांतील मिसिंग नागरिकांचीही माहिती गोळा करण्यात येत असल्याचे डी.एन. नगर पोलिसांनी सांगितले.

Web Title: The murder of the young man in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.