खून करणाऱ्या आरोपीना कठोर शासन करुन दांडगे कुटुंबाचे पुनर्वसन करणार....
By Admin | Published: August 18, 2016 07:46 PM2016-08-18T19:46:35+5:302016-08-18T20:16:25+5:30
सिल्लोड तालुक्यातील डोंगरगांव येथे गावठान जागेच्या मालकी हक्कावरुण दोन गटात झालेल्या तुंबळ हानामारीत मरण पावलेल्या अमोल दांडगे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 18 - सिल्लोड तालुक्यातील डोंगरगांव येथे गावठाण जागेच्या मालकी हक्कावरुन दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत मरण पावलेल्या अमोल दांडगे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन जिल्हा अधिकारी निधी पाण्डेय यांनी कुटुंबाचे सांत्वन केले. खून करणाऱ्या आरोपीना कठोर शासन करुन दांडगे कुटुंबाचे पुनर्वसन करणार असल्याची माहिती दिली.
गुरुवारी दुपारी जिल्हा अधिकारी निधी पाण्डेय, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शेख जलील, निरीक्षक सतीश सालवे, विष्णु काटकर, उपजिल्हा अधिकारी दिपक धाडगे, नायब तहसीलदार संजय सोनवणे,पोलिस निरीक्षक कांतिलाल पाटिल, शंकर शिंदे, यांनी दांडगे कुटुंबाची भेट घेऊन सात्वंन केले.
2 लाख 50 हजाराची मदत - या वेळी मयत अमोल ची आई इंदुबाई दांडगे, बहीन वैशाली दांडगे, उषा पगारे, भाऊ रवी दांडगे याना समाज कल्याण विभागा कडून नागरी अत्याचार अर्थ सहाय निधीतून तात्काळ 2 लाख 50हजार रुपयांचा धनादेश जिल्हा अधिकारी निधी पाण्डेय यांच्या हस्ते दिला.
पुनर्वसन करणार
डोंगरगांव येथे दलीत कुटुंबावर अत्याचार झाला आहे. त्याना गावात राहण्याची भीती वाटत असेलतर त्यांचे दुसऱ्या ठीकाणी पुनर्वसन केल्या जाईल. मुलाच्या आईला समाज कल्याण विभागा कडून दर महा 1 हजार रूपये पेंशन सुरु केली जाईल.न्यायालयात खटला चालवन्यासाठी वकिल उपलब्ध करुण देण्यात येईल.
- निधी पाण्डेय जिल्हा अधिकारी.
लोकांनी सयम पाळावा
सिल्लोड तालुक्यातील डोंगरगांव येथे घडलेली घटना दुर्दवी आहे. मात्र लोकांनी सयम पाळावा. आरोपिना कठोर शासन करण्यात येईल. दलीत कुटुंबाला न्याय मिळवुन देण्यात येईल. असे सांगून तालुक्यातील नागरिकांनी सयम ठेवल्याने त्यांचे आभार मानले.व पोलिस योग्य दिशेने तपास करीत असल्याने निधी पाण्डेय यांनी पोलिसांची प्रशसा केली.
आरोपिना बेड्या ठोकनार
या गुह्यातील आरोपिना पकडन्यासाठी सिल्लोड पोलिस, गुन्हे शाखा, एडीएस, सायबर लैब विभागाचे 6 पथक ठीक ठिकाणी रवाना झाले आहे. लवकरच आरोपीना अटक केली जाईल असा विश्वास सहायक पोलिस निरीक्षक शंकर शिंदे यांनी व्यक्त केला.
23 ऑगस्ट पर्यन्त पोलिस कोठडी
अटक करण्यात आलेला आरोपी शेख मोहमद ज़ाकिर याला विशेष न्यायालयात हजर केले असता आरोपीला 23 ऑ गस्त पर्यन्त पोलिस कोठडी देण्यात आल्याची माहिती सरकारी अभी योक्ता नवले यांनी दिली.
आरोपिना तात्काळ अटक करावी
फरार आरोपिना तात्काळ अटक करावी . यात दोषी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्या विरुद्ध कठोर कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी पंचायत समिती सभापती लताबाई वानखेडे, मजूर फेडरेशन चे संचालक दादाराव वानखेड़े भीम सेनेचे राष्ट्रिय नेते माधवराव बनकर यांनी केली.
.
21हजाराची मदत
मयत अमोलची आई इंदुबाई दांडगे, बहीन वैशाली दांडगे, उषा पगारे, भाऊ रवी दांडगे याना सिल्लोड पंचायत समिती च्या सभापति लताबाई वानखेडे, दादाराव वानखेड़े यांनी वयक्तिक रोख 21 हजाराची मदत दिली.या वेळी त्यांच्या सोबत गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे ,भीम सेनेचे राष्ट्रिय नेते माधवराव बनकर हजर होते
आमदार कुठे ...?
सिल्लोड तालुक्यात दलीत कुटुंबावर अत्याचार होत आहे. खून झाले तरी सिल्लोड तालुक्यांचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दलीत कुटुंबाचे सात्व न सुद्धा केले नाही कुठे आहे. सबके साथ सबका विकास म्हनणारे आमदार अशी बोचरी टिका दादाराव वानखेड़े यांनी यावेळी केली.
डोंगरगावात म्हशांन शांतता
या घटनेमुळे डोंगरगाव येथे तणाव पूर्ण शांतता असून घरा बाहेर कुणी पड़ताना दिसत नाही. अनुचित घटना घडू नये म्हणून बुधवारी दोन्ही समाजा च्या लोकांनी रात्र जागुण काढली.गावात मोठा पोलिस बंदोबस्त तै नात करण्यात आला आहे