‘मार्ड’ची मानवी हक्क आयोगाकडे धाव

By admin | Published: March 26, 2016 01:50 AM2016-03-26T01:50:30+5:302016-03-26T01:50:30+5:30

निवासी डॉक्टरांंना ८ तासांच्या ड्युटीसाठी प्रयत्न करू, असे आश्वासन देणाऱ्या वैद्यकीय शिक्षण संचालकांनी मानवी हक्क आयोगाकडे उत्तर देताना घूमजाव केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र

Murde's human rights commission | ‘मार्ड’ची मानवी हक्क आयोगाकडे धाव

‘मार्ड’ची मानवी हक्क आयोगाकडे धाव

Next

मुंबई : निवासी डॉक्टरांंना ८ तासांच्या ड्युटीसाठी प्रयत्न करू, असे आश्वासन देणाऱ्या वैद्यकीय शिक्षण संचालकांनी मानवी हक्क आयोगाकडे उत्तर देताना घूमजाव केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र असोसिएशन आॅफ रेसिडंट डॉक्टर (मार्ड) मानवी हक्क आयोगाकडे ‘निवासी डॉक्टरांचे हक्क’ मिळण्यासाठी धाव घेतली आहे.
निवासी डॉक्टरांकडून वसतिगृहासाठी शुल्क आकारले जाते. पण, त्यांना पायाभूत सुविधा मिळत नाही. डॉक्टरांची कमतरता असते. तेव्हा सलग २४ तास डॉक्टर काम करतात. त्याचबरोबर संचालकांनी ‘मध्यवर्ती निवासी योजना’ आखण्यास सुरुवात केली आहे. तरीही त्यांनी असे उत्तर दिले असल्याचे मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Murde's human rights commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.