घटस्थापनेचा मुहूर्त सकाळी

By admin | Published: September 30, 2016 04:57 AM2016-09-30T04:57:48+5:302016-09-30T04:57:48+5:30

गणपतीनंतर वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. नऊ रात्रींच्या या उत्सवाचा जागर करण्यासाठी शहरातील देवीची विविध मंदिरे सज्ज झाली आहेत. उद्या (दि. १ आॅक्टोबर) मंदिरांसह घरोघरी

The museum of the establishment morning | घटस्थापनेचा मुहूर्त सकाळी

घटस्थापनेचा मुहूर्त सकाळी

Next

पुणे : गणपतीनंतर वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. नऊ रात्रींच्या या उत्सवाचा जागर करण्यासाठी शहरातील देवीची विविध मंदिरे सज्ज झाली आहेत. उद्या (दि. १ आॅक्टोबर) मंदिरांसह घरोघरी होणाऱ्या देवीच्या घटस्थापनेसाठी सकाळी ६.१५ ते १०.२४ हा सर्वोत्तम मुहूर्त आहे.
घटस्थापनेने सुरू होणारा नवरात्रोत्सव यंदा ११ दिवसांचा असून, शनिवारी आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होत असलेल्या देवी नवरात्र महोत्सवाची घटस्थापना सूर्योदय ६.१५ ते १०.२४ या वेळात करावी, असे शारदा ज्ञानपीठम्चे संस्थापक पं. वसंतराव गाडगीळ यांनी सांगितले. पहाटे साडेपाचनंतर उद्या (शुक्रवारी) असणारी सर्वपित्री अमावास्या संपत असल्यामुळे त्यानंतरच घटस्थापनेने नवरात्रारंभ करावा, असेही ते म्हणाले.

नवरात्रोत्सव ११ दिवस
यंदाच्या घटस्थापनेची प्रतिपदा ही प्रारंभिक तिथीच शनिवारी आणि रविवारी अशी २ दिवस आल्यामुळे विनायक चतुर्थी ५व्या दिवशी (बुधवार, दि. ५ आॅक्टोबर) व दुर्गाष्टमी ९व्या दिवशी (रविवार, दि. ९ आॅक्टोबर), महानवमी १०व्या दिवशी (सोमवार, दि. १० आॅक्टोबर) आणि विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण ११व्या दिवशी (मंगळवार, दि. ११
आॅक्टोबर) येऊन नवरात्र महोत्सव ११ दिवस चालणार आहे.
या नवरात्रोत्सवात देवीच्या षोडशोपचारांतील महापूजेचा एक महत्त्वाचा अनिवार्य भाग म्हणून पंचांगश्रवण, कथावाचन, नृत्य, गीत, वाद्य अशा ललितकलांचेही कार्यक्रम राजोपचार सेवा म्हणून सादर करावेत, असे आवाहन पं. गाडगीळ यांनी केले आहे.

Web Title: The museum of the establishment morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.