संगीत भजन महोत्सवाला १७२ तास पूर्ण

By admin | Published: June 10, 2016 02:54 AM2016-06-10T02:54:30+5:302016-06-10T02:54:30+5:30

भजन परंपरेतून उदात्त भारतीय संस्कृतीची महती जपली जात आहे

Music Bhajan Festival completes 172 hours | संगीत भजन महोत्सवाला १७२ तास पूर्ण

संगीत भजन महोत्सवाला १७२ तास पूर्ण

Next


पनवेल : भजन परंपरेतून उदात्त भारतीय संस्कृतीची महती जपली जात आहे. या भजनी मंडळांना प्रोत्साहन मिळावे, नव्या पिढीत भजन परंपरेची संस्कारक्षम संस्कृती रुजावी व भारतीय एकात्मता टिकून राहावी म्हणून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग गायक-वादक कलावंत समितीच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेलमध्ये २ जूनपासून अखंडपणे भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या विश्वविक्र मी १९२ तास अखंड संगीत भजन महोत्सव व भजन संमेलनाचा समारोप शुक्र वार १० जून सायंकाळी ४ वाजता होणार आहे.
पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सहभागात माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, लोकमतचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी. ए. तेटगुरे, अशोक गोडबोले, अ‍ॅड. प्रसाद पाटील, जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील, सिडकोचे मुख्य अभियंता के. के. वरखेडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सोहळ्यास भजनप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग गायक-वादक कलावंत समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
>महोत्सवाची वाटचाल विश्वविक्रमाकडे सुरू आहे. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या महोत्सवाची नोंद होणार आहे. २७६ मंडळांपैकी २०० मंडळांनी या सोहळ्यात सहभाग घेतला असून शुक्रवारी महोत्सवाची सांगता होणार आहे.

Web Title: Music Bhajan Festival completes 172 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.