संगीतकार आदेश श्रीवास्तव कालवश...!
By admin | Published: September 5, 2015 04:39 AM2015-09-05T04:39:46+5:302015-09-05T08:34:39+5:30
सुप्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचे आज पहाटे कॅन्सरच्या आजारामुळे निधन झाले. अंधेरी येथील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये ४० दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - सुप्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचे आज पहाटे कॅन्सरच्या आजारामुळे निधन झाले. अंधेरी येथील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये ४० दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ५१ वर्षाचे होते. मागील काही वर्षांपासून त्यांना कॅन्सरच्या विकारानं ग्रासलं होतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांचा आजार बळावला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावर कीमोथैरेपी करनं बंद केली होती.
त्यांच्या पश्चात दोन मुलं आहेत, त्यांच्या निधनानंतर सोशल मिडियावर अनेक मान्यवरांनी आपले दुःख व्यक्त केले आहे.
आदेश श्रीवास्तव यांनी आपल्या संगीतच्या कारर्किदीत रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. ‘चलते चलते’, ‘बाबुल’, ‘बागबान’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘राजनीति’ ‘देव’ यासरख्या जवळजवळ १०० चित्रपटास त्यांनी संगीत दिले आहे.
आदेश श्रीवास्तव यांच्या पार्थिवावर आज दुपारी ओशिवारा स्मशान भूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.