जागतिक शांततेसाठी संगीत
By Admin | Published: June 21, 2016 12:26 AM2016-06-21T00:26:29+5:302016-06-21T00:34:29+5:30
१९६० च्या सुमारास शहरातील तरुणांवर प्रभाव पाडणारे अमेरिकन सोल म्युझिक व रेग्गेचाही प्रभाव राहिला. स्थानिकांमध्ये प्रिय असलेले बबलगम आणि जगाचे लक्ष वेधून घेणारी पहिली आफ्रिकन
१९६० च्या सुमारास शहरातील तरुणांवर प्रभाव पाडणारे अमेरिकन सोल म्युझिक व रेग्गेचाही प्रभाव राहिला. स्थानिकांमध्ये प्रिय असलेले बबलगम आणि जगाचे लक्ष वेधून घेणारी पहिली आफ्रिकन लोकप्रिय संगीत शैली क्वेला. १९०० च्या सुमारास असलेली मराबी स्टाईल यांनी दक्षिण आफ्रिका, लेसोथो, स्वाझीलँड यांचे संगीत समृद्ध केले.
जागतिक पातळीवर संगीत-दिन साजरा करण्याची प्रथा प्रथम फ्रान्सने सुरू केली. या दिवसाला तेथे ‘फेटे डे’ला ‘म्युसिक्यू’ असे संबोधतात. फ्रान्समधील एक ख्यातनाम संगीत दिग्दर्शक मॉरिश फ्लेरेट यांनी त्यावेळी असलेल्या सांस्कृतिक विभागासाठी या सोहळ््याची सुरुवात केली. लोकांना मोफत संगीत जलसे ऐकायला मिळावे यासाठी फ्रान्समध्ये एक घोषणा तयार करण्यात आली होती. ‘म्युसिक्यू’ याचा अर्थ संगीत निर्माण करा.
जागतिक संगीत दिवस साजरा करण्यामागे प्रामुख्याने नवखे तसेच तज्ज्ञ संगीतकारांना रोड-शो करण्यास प्रोत्साहन देणे. संगीताचा विविध प्रकारे प्रचार आणि प्रसार करणे आहे. फें्रच कायद्यानुसार रात्री आयोजित केलेल्या जलसांना रितसर परवानगी असते. आॅस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्रिटन, लुक्झेम्बर्ग, जर्मनी, स्वित्झर्लंड, कोस्टारिका, इस्रायल, चीन, भारत, लेबेनन, मलेशिया, मोरोक्को आदी देशांत मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो. जगभर संगीताच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करावी यासाठी युनेस्कोचे संगीत विशारद लॉर्ड मेहुदी मेनुहीन यांनी १९७५ साली आंतरराष्ट्रीय स्तरावर संगीत दिवसाचा प्रारंभ केला.
डीजे, कलाकार, कवी, नृत्य आयोजन करणाऱ्या कंपन्या, गु्रप, १०० ड्रमर्सचा गु्रप चालविणारा झिम नाग्वाना गायक, नर्तक आपल्या ग्रामीण आणि पारंपरिक संगीताच्या साथीने नव्या युगातले जॅझ संगीत निर्माण करीत आहेत.
जॅझ संगीतात जास्त सॅक्सोफोन महत्वाचा होता तसा इलेक्ट्रिक गिटारने मबाक्वांगा संगीतात जान आणली.
युरोपियन कोरल म्युझिक, अमेरिकन प्रभाव असलेले झुलूचॅपेल्ला आणि आफ्रिकन पारंपरिक गीतांच्या मिश्रणाने गोस्पल या प्रकारचे संगीत तयार झाले. दक्षिण आफ्रिकेच्या सुमारे ८० ख्रिश्चन कृष्णवर्णीय लोकांनी या संगीताला आश्रय दिला. सोथो, झुलू, पेडी आणि शॅनगॅन या विभागातील संगीतकारांनी शहरी भागापेक्षा वेगळा ठसा असणारे प्रभावी ग्रामीण संगीत उभे केले.
रॉक, जॅझ, क्लासिकल, गॉसपेल, रॅप, रेग्गे, मासाकांदा, माक्वांगा, क्वेटो आदी शैलीच्या संगीतकारांनी संगीताच्या क्षेत्रात अलोट वैभव प्राप्त केले. विरोध व्यक्त करण्याचे आणि आपले अस्तित्व दाखविण्याचे महत्त्वाचे माध्यम म्हणजे जॅझ. मिरियम ऊर्फ मामा आफ्रिका, अब्दुल्ला इब्राहिम आणि ट्रम्पेट कलाकार ह्यू मसेकेला यांच्यासारख्या गुणवान आणि आपल्या लोकांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणाऱ्या संगीतकारांच्या हातात या जॅझ संगीताची सूत्रे होती. त्यांनी जॅझ संगीताचा स्वर्ग उभा केला.
या स्वर्गाद्वारे आफ्रिकन व्यथा जगासमोर मांडल्या. ब्लू नोट्स ग्रुपचा ख्रिस मॅक्ग्रेगर सॅक्सोफोनीस डुडू पुक्वाना यांनी युरोपियन जॅझचा चेहरामोहरा बदलला. इंग्लंडमध्ये बस्तान बसविल्यानंतर जॅझ-सॅफ फ्युजन, लॅटिन आणि मलय यांच्या मिश्रणातून नवा गंध आला. वर्णद्वेष समाप्त झाल्यानंतर मकेबो व मसेकाला यांनी चाहते निर्माण करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत प्रवेश केला. तेथे संगीताचा राजदूत म्हणून मसेकेलाने नाव कमावले.