मुस्लिमबहुल विभागात मुस्लिम उमेदवारच द्यावा
By admin | Published: May 18, 2015 03:46 AM2015-05-18T03:46:58+5:302015-05-18T03:46:58+5:30
एमआयएमच्या तडाख्यामुळे मुस्लिम समाजातील काँग्रेसच्या स्थानाला धक्का बसला आहे. एमआयमचा धोका परतवून लावण्यासाठी आगामी काळातील
मुंबई : एमआयएमच्या तडाख्यामुळे मुस्लिम समाजातील काँग्रेसच्या स्थानाला धक्का बसला आहे. एमआयमचा धोका परतवून लावण्यासाठी आगामी काळातील निवडणुकांमध्ये मुस्लिमबहुल भागात त्याच समाजाचा उमेदवार देण्याची आग्रही मागणी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाने पक्षाकडे केली आहे.
आगामी महापालिका, नगरपालिका आणि अन्य निवडणुकांमध्ये मुस्लिम समाजाला प्रतिनिधीत्व मिळावे. ज्या ठिकाणी मुस्लिम समाजाची लोकसंख्या तीस टक्के वा अधिक आहे तिथे मुस्लिम उमेदवारच द्यावा, ही पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाची मागणी तत्वत: मान्य करण्यात आल्याची माहिती मुंबई काँग्रेसच्या अल्पसंख्य विभागाचे निजामुद्दीन रईन यांनी दिली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत अलकिडेच मस्लिम मौलवी, इमाम आणि अन्य धार्मिक नेत्यांच्या बैठकीतही मुस्लिम समाजातील प्रश्नांबाबत चर्चा झाली. पारंपारीकदृष्टया काँग्रेसकडे असणारा मुस्लिम मतदार पक्षापासून दुारवत असून त्याच्या कारणांवर यावेळी चर्चा झाली. मुस्लिम आरक्षण, गोवंश हत्याबंदी, मुस्लिम विकासासाठी अपुरा निधी आदी मुद्दे या बैठकीत उचलण्यात आले.
तिकीट वाटपात मुस्लिमांना प्रतिनिधीत्व देण्याबाबत अशोक चव्हाण आणि निरुपम यांनी सकारात्मक भूमिका घेतली. ज्या भागात मुस्लिम मतदारांची प्रमाण तीस टक्कयापर्यंत असेल तिथे याच समाजातील उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल. त्यासाठी अशा भागाचे सर्वेक्षण करण्यात येईल, असे रईन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)