मालेगावमध्ये मुस्लिम समाजाचा मोर्चा
By admin | Published: October 7, 2016 09:39 PM2016-10-07T21:39:00+5:302016-10-07T22:52:51+5:30
मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्यावे. या प्रमुख मागणीसाठी आज मालेगाव शहरातील जामेअतु स्वालेहात पासून एक विराट मोर्चा काढण्यात आला.
Next
>ऑनलाइन लोकमत
मालेगाव, दि.07 - मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्यावे. या प्रमुख मागणीसाठी आज मालेगाव शहरातील जामेअतु स्वालेहात पासून एक विराट मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मालेगावसह जिल्ह्य़ातील हजारो मुस्लिम बांधवांनी सहभागी झाले होते. मुस्लिम रिझर्वेशन फेडरेशनचे अध्यक्ष आमदार आसिफ शेख यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. शेर ए म्हैसूर टिपु सुलतान यांचे वंशज सैय्यद मन्सूर अली यांची उपस्थिती मोर्चाचे आकर्षण ठरले.
मुस्लिमांना शासकीय व निमशासकीय सेवेत पाच टक्के आरक्षण देण्यात यावे. उच्च शिक्षणासाठी 100%शिष्यवृत्ती देण्यात यावी. राज्यातील एक लाख एकर जागा वक्फ बोर्ड ची असुन त्यापैकी 70 हजार एकर जमिनीवर कब्जा आहे. तो काढून वक्फ बोर्डाच्या स्वाधीन करण्यात यावी. यातुन मिळणारे उत्पन्न मुस्लिम समाजाच्या विकासासाठी खर्च करण्यात यावे.