उस्मानाबादेत मुस्लीम समाजाचा मूकमोर्चा
By admin | Published: January 6, 2017 03:35 AM2017-01-06T03:35:15+5:302017-01-06T03:35:15+5:30
विविध समित्यांनी सूचविल्यानुसार शिक्षण, नोकरीत आरक्षण लागू करावे, शरियत कायद्यामध्ये कोणीही हस्तक्षेप, ढवळाढवळ करू नये यासह जवळपास नऊ मागण्यांसाठी मुस्लीम
उस्मानाबाद : विविध समित्यांनी सूचविल्यानुसार शिक्षण, नोकरीत आरक्षण लागू करावे, शरियत कायद्यामध्ये कोणीही हस्तक्षेप, ढवळाढवळ करू नये यासह जवळपास नऊ मागण्यांसाठी मुस्लीम आरक्षण महा-मूक मोर्चा समितीच्या वतीने गुरूवारी उस्मानाबादेत शिस्तबध्द मोर्चा काढण्यात आला़ शहरातील गाझी मैदावरून निघालेल्या या मूकमोर्चात मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव सहभागी झाले होते़
राष्ट्रगीताने मूकमोर्चास प्रारंभ झाला़ मोर्चाच्या सुरुवातीला पांढरा पोशाख व डोक्यावर भगव्या, पांढऱ्या, हिरव्या रंगाच्या टोप्या घातलेल्या युवकांनी तिरंगा तयार केला होता़ त्यापाठोपाठ विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन मोठा जनसमुदाय जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ तेथे लहान मुलांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ त्यानंतर लहान मुलांनी निवेदनाचे वाचन केले व प्रार्थनेने मोर्चाची सांगता झाली़ मुस्लीम बांधवांनी शिस्तबध्द पद्धतीन हा मोर्चा यशस्वी केला़ (प्रतिनिधी)