त-हाळा दर्गास्थळी मुस्लीम संतांची मांदियाळी!
By Admin | Published: March 30, 2017 02:46 AM2017-03-30T02:46:30+5:302017-03-30T02:46:30+5:30
दादा हयात कलंदर यांचा ऊर्स महोत्सव; ३१ मार्च रोजी रंगणार कव्वालीचा मुकाबला.
नाना देवळे
मंगरूळपीर (जि. वाशिम), दि. २९- मंगरूळपीर येथील दादा हयात कलंदर यांच्या ऊर्स महोत्सवास २८ मार्चपासून प्रारंभ झाला. ३0 मार्चपर्यंत चालणार्या या महोत्सवासाठी जगभरातील तथा विविध पंथांमधील मुस्लीम संतांनी तद्वतच पठाण बांधवांनी उत्स्फूर्त हजेरी लावली असून, जगप्रसिद्ध तर्हाळा येथील सैयद बाबाजान दग्र्यावर या मंडळींची मांदियाळी जमली आहे.
इस्लाम धर्मीयातील साडेतीन कलंदरपैकी एक असलेले अहमद कबीर ऊर्फ दादा हयात कलंदर यांच्या ७८७ व्या ऊर्स महोत्सवास २८ मार्चपासून उत्साहात प्रारंभ झाला. यादरम्यान मंगरूळपीर येथील हिंदू धर्मीयांनी मुस्लीम समाजातील संतांचा आदरसत्कार करून हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन घडविले.
संदल शरीफच्या माध्यमातून दादा हयात कलंदर यांच्या दग्र्यावर चादर चढवून या उत्सवाची सुरुवात झाली. या ऊर्सनिमित्त तर्हाळा येथील दर्गाप्रमुख सैयद बद्रुद्दीन आगासाहेब सैयद शिराजोद्दीन आगासाहेब यांच्या हस्ते ३0 मार्चला ह्यनिशाणह्ण या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. ३१ मार्च रोजी कव्वालीचा मुकाबला, १ एप्रिल रोजी खतमाचा कार्यक्रम होईल. या विविध कार्यक्रमांसाठी अफगाणिस्तान, बलुचिस्तान, इराक-इराण आदी देशांमधील पठाण बांधवांनी तर्हाळाच्या दग्र्यावर गर्दी केली आहे. यासह मुस्लीम समाजातील रफाई पंथ, जलाली पंथ, सुफी पंथामधील संतांनीही उपस्थिती दर्शविली आहे.