लोणावळ्यात मुस्लीम बांधवांनी केला पाकिस्तानचा जाहीर निषेध
By admin | Published: October 1, 2016 03:47 AM2016-10-01T03:47:52+5:302016-10-01T03:47:52+5:30
पाकिस्तानच्या नापाक कारवाया व उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ लोणावळा शहरातील मुस्लीम समाजातर्फे शुक्रवारी शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली.
लोणावळा : पाकिस्तानच्या नापाक कारवाया व उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ लोणावळा शहरातील मुस्लीम समाजातर्फे शुक्रवारी शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. ‘हिंदुस्थान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल आॅपरेशनचे स्वागत करत नवाज शरीफ मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.
काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे व कायम राहील. पाकिस्तान सातत्याने भारताच्या विरोधात कारस्थाने करत राहिला आहे. पाकच्या या नापाक कारवाया व दहशतवादाला भारत कधीच भीक घालणार नाही. भारत हा अभेद्य असून, येथील मुस्लीम समाज हा भारतीय लष्कराच्या पाठीशी आहे. दूध मागोंगे तो खिर देंगे, काश्मीर मागोंगे तो चिर देंगे, अशा शब्दांत मुस्लीम समाजाने पाकचा निषेध नोंदवला व उरी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली.
नगराध्यक्ष अमित गवळी, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, लोणावळ्याचे इमामसाहब मौलाना मोईनद्दिन खान असरफी, माजी नगरसेवक नासिर शेख, उपनगराध्यक्ष भरत हारपुडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष नारायण आंबेकर, दत्तात्रय गवळी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू बोराटी, यशवंत पायगुडे, भाजपाचे शहराध्यक्ष बाबा शेट्टी, बाळासाहेब जाधव, निखिल कवीश्वर, शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल शेट्टी, संध्या खंडेलवाल, मुस्लीम समाजाचे अब्बास खान, जाबिर शेख, मुस्ताफ काटेवाडी, शकिल शेख, अॅड. अश्पाक काझी, फिरोज बागवान, आरपीआय अल्पसंख्याक सेलचे मावळ तालुकाध्यक्ष तुपेलभाई शेख, नगरसेवक गिरीश कांबळे, संजय गायकवाड, महंमद मण्यार, सलिम मण्यार यांच्यासह शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व मुस्लीम बांधव उपस्थित होते.