‘मुस्लिम आरक्षणाने ओबीसी, मराठा आरक्षण धोक्यात’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 07:01 IST2020-02-29T03:02:49+5:302020-02-29T07:01:23+5:30
धर्माच्या आधारे आरक्षण देण्यास भाजपचा विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘मुस्लिम आरक्षणाने ओबीसी, मराठा आरक्षण धोक्यात’
मुंबई : अनुसूचित जाती-जमातींना त्यांच्या लोकसंख्येच्या अनुपातात आरक्षण दिले जाते व ते कमी करता येत नाही. अशावेळी मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण दिले तर ओबीसी व मराठा समााजाच्या आरक्षणाला धक्का लागण्याची शक्यता आहे, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
धर्माच्या आधारे आरक्षण देण्यास भाजपचा विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. किमान समान कार्यक्रम ठरवताना मुस्लिम आरक्षणही शिवसेनेने मान्य केले होते असे नवाब मलिक यांच्या वक्तव्यावरून दिसते, असा चिमटा त्यांनी काढला.