५ जानेवारीच्या यादीत नाव असणे अनिवार्य

By admin | Published: February 16, 2017 01:54 PM2017-02-16T13:54:49+5:302017-02-16T13:54:49+5:30

२१ फेब्रुवारीला होवू घातलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी ५ जानेवारी २०१७ च्या यादीमध्ये नाव असणे अनिवार्य आहे.

Must be listed on January 5th | ५ जानेवारीच्या यादीत नाव असणे अनिवार्य

५ जानेवारीच्या यादीत नाव असणे अनिवार्य

Next

५ जानेवारीच्या यादीत नाव असणे अनिवार्य
तर मतदानापासून वंचित: नाव शोधण्यासाठी अ‍ॅप
अमरावती : २१ फेब्रुवारीला होवू घातलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी ५ जानेवारी २०१७ च्या यादीमध्ये नाव असणे अनिवार्य आहे. या यादीत नाव नसल्यास संबंधितांना मतदान करता येणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
५ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करून २१ जानेवारीला अंतिम मतदार यादी घोषित करण्यात आली होती. २१ फेब्रुवारीला २२ प्रभागातील ८७ जागांसाठी मतदान होईल. या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारास सर्वसाधारणपणे चार मते देणे अनिवार्य आहे. विशेषत: नामनिर्देशनपत्रासोबत उमेदवाराने दिलेल्या शपथपत्राचा गोषवारा वर्तमानपत्र व मतदान केंद्रासमोर मतदारांच्या माहितीसाठी प्रकाशित करण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने तयार केलेल्या तीन मोबाईल अप्लिकेशनचा लाभ घेता येणार आहे. प्रभागनिहाय मतदार यादीत नाव व मतदान केंद्र शोधण्याकरिता ‘ट्रु व्होटर’ वापरता येईल. याशिवाय ९०२९९०१९०१ या मोबाईल क्रमांकावर मिसकॉल देवूनही मतदारांना नाव शोधण्यात मदत केली जाणार आहे. याशिवाय ‘कॉप’ या अ‍ॅपवर जे नागरिक नोंदणी करतील, त्यांना आचारसंहिता भंगाची तक्रार तत्काळ नोंदविता येईल. (प्रतिनिधी)
मतदान जनजागृती
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महापालिकेने जोरकस पावले उचलली असून फेसबुक व अन्य समान माध्यमांचा उपयोग करण्यात आला आहे. फ्लेक्स आणि बॅनरच्या माध्यमातून ‘मी मतदान करणारच’ अशा प्रकारची जनजागृती करण्यात येत आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. फेसबुक मॅसेंजरवरील महाव्होटर चॅट बॉटमध्ये मतदार जागृतीच्या विविध उपक्रमांचा जनतेने लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Must be listed on January 5th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.