मुता:यांची समस्या आता ‘गुगल मॅप’वर
By Admin | Published: October 3, 2014 12:53 AM2014-10-03T00:53:39+5:302014-10-03T00:53:39+5:30
महिलांना स्वतंत्र, स्वच्छ, मोफत आणि सार्वजनिक मुता:या असाव्यात म्हणून गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेला लढा आता हायटेक होणार आहे.
>मुंबई : महिलांना स्वतंत्र, स्वच्छ, मोफत आणि सार्वजनिक मुता:या असाव्यात म्हणून गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेला लढा आता हायटेक होणार आहे. दस:यापासून ज्या मुतारीमध्ये नियमांचे पालन होत नसेल त्या मुता:यांचे फोटो काढून, दोन ओळीत माहिती देऊन गुगल मॅपवर टाकण्याचे आवाहन राइट टू पी या चळवळीद्वारे करण्यात आले आहे.
ऑगस्ट महिन्यामध्ये महापालिका आयुक्तांनी एक परिपत्रक काढले होते. यामध्ये स्वच्छतागृहांमध्ये महिलांना मुता:या मोफत, असा फलक लावावा, तिथे मुतारीसाठी एक ब्लॉक वेगळा असावा. याचबरोबरीने तिथे साबण, कचरापेटी अशा वस्तू असाव्यात असे या परिपत्रकात नमूद केले होते. या परिपत्रकाची 15 दिवसांत अंमलबजावणी व्हावी, असेही सांगण्यात आले होते. यानंतर झालेल्या आढावा बैठकीत काहीसे निराशाजनक चित्र समोर आले होते. मात्र त्यानंतर काही ठिकाणी सुधारणा झालेल्या दिसत आहेत. आता सर्वार्पयत पोहोचण्यासाठी गुगल मॅपचा उपयोग केला जाणार असल्याचे आरटीपी सदस्या सुप्रिया सोनार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
च्ऑनलाइन मोहीम सुरू केल्याचा एक फायदा असा आहे की, या मोहिमेमध्ये कोणीही, कधीही सहभागी होऊ शकते. एखाद्या ठिकाणची माहिती गुगल मॅपवर टाकल्यावर ते शेअर करा, असे सुप्रिया यांनी सांगितले.
च्यानंतर काय कामे झाली, नाही झाली ही सर्व माहिती फेसबुक आणि टि¦टरवर टाकली जाणार आहे. या माहितीवरून एक ‘जनता अहवाल’ तयार करण्यात येणार असल्याचे सुप्रिया यांनी सांगितले.