MVA Mumbai Morcha & BJP's 'Maafi Maango' Protest Live: सरकारमध्ये स्पर्धा सुरु झाली ती महाराष्ट्राच्या बदनामीची; शरद पवार यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 08:24 AM2022-12-17T08:24:33+5:302022-12-17T14:22:30+5:30
मुंबईत आज निघणाऱ्या दोन मोर्चांनी राजकीय वातावरण तापणार आहे. महाविकास आघाडीचा शिंदे-फडणवीस सरकारला टार्गेट करणारा हल्लाबोल मोर्चा एकीकडे, तर ...
मुंबईत आज निघणाऱ्या दोन मोर्चांनी राजकीय वातावरण तापणार आहे. महाविकास आघाडीचा शिंदे-फडणवीस सरकारला टार्गेट करणारा हल्लाबोल मोर्चा एकीकडे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या मोर्चाला प्रत्त्युत्तर देण्यासाठी भाजपकडून माफी मांगो आंदोलन केले जाणार आहे. हल्लाबोल मोर्चातून महाविकास आघाडी शक्तिप्रदर्शन करणार आहे. महापुरुषांचा अवमान, सीमाप्रश्न, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांसाठी हा मोर्चा निघणार असून पोलिसांनी काही अटी शर्थींसह परवानगी दिली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मुंबईभर ‘माफी मांगो’ आंदोलन करणार आहे.
या आंदोलनात जागोजागी ‘उद्धव ठाकरे माफी मागा, नाना पटोले माफी मागा, अजित पवार माफी मागा,’ असे फलक झळकावण्यात येणार आहेत. तसेच काळे झेंडे दाखवत महाविकास आघाडीचा निषेध करण्यात येईल, असे शेलार यांनी सांगितले.
01:59 PM
सरकामध्ये स्पर्धा सुरु झाली ती महाराष्ट्राच्या बदनामीची - शरद पवार
कोणत्याही राज्यात गेलो तरी तिथे महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचे नाव आदराने घेतले जाते. या राज्यपालांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही. म्हणून केंद्र सरकारला सांगतोय या राज्यपालांची लवकरात लवकर हकालपट्टी करा. या सरकामध्ये स्पर्धा सुरु झाली ती महाराष्ट्राच्या बदनामीची, अशा शब्दांत शरद पवार यांनी टीका केली.
01:58 PM
महाराष्ट्राच्या सन्मानासाठी एकत्र आलो आहोत- शरद पवार
महाराष्ट्राच्या सन्मानासाठी एकत्र आलो आहोत. लोकांच्या मनावर एक नाव अखंड आहे. छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र कदापीही सहन करणार नाही. - शरद पवार.
01:50 PM
मी एकटा नाही माझ्यासोबत लाखो महाराष्ट्र प्रेमी महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावर चालणार - उद्धव ठाकरे
बऱ्याच वर्षांनंतर देशाने एवढा मोठा मोर्चा पाहिला असेल. ज्यावेळी मोर्चाची घोषणा केली, मला विचारले गेले, तुम्ही चालणार का? मी एकटा नाही माझ्यासोबत लाखो महाराष्ट्र प्रेमी महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावर चालणार आहेत. हीच वेळ आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्रचंड संघर्ष करावा लागला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, बेळगाव कारवार बिदर भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे यासाठी हा मोर्चा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
खुर्ची गेली तरी बेहत्तर पण महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही, तडजोड करणार नाही, ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती. राज्यपालांना मी मानत नाही, त्या पदावर कोणीही बसावे आणि महाराष्ट्राच्या टपल्यात मारावे हे चालणार नाही. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले नसते तर आपण कुठे असलो असतो, ते त्यांच्या मंत्र्याने भीक हा शब्द वापरून दाखविले आहे. हे वैचारिक दारिद्र्य आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
हे लफंगे आहेत, महाराष्ट्र लुटायला आले आहेत. मुंबईचे पालकमंत्री, त्यांनी महाराजांची आग्र्याहून सुटका खोके घेऊन पसार झालेल्यांशी केली आहे. आपल्या राजकीय पक्षाच्या, स्वत:च्या आईच्या छातीत वार करून ते पसार झाले, त्यांची तुलना करताय, अशी टीका ठाकरे यांनी केली.
हे पालकमंत्री मुंबई स्क्वेअर फुटात मोजत आहेत, असेही ते म्हणाले.
01:37 PM
राज्यपालांना हटविले गेले पाहिजे. पुन्हा अशाप्रकारची पुनरावृत्ती होणार नाही हे पाहिले पाहिजे. विधानसभा अधिवेशनात त्यासाठी कायदा आणा - अजित पवार
चांद्यापासून बांद्यापर्यंत वेगवेगळ्या भागातून कार्यकर्ते आलेत. ही वेळ का आली, जे काही आता घडतेय त्याला विरोध केला पाहिजे. शिवाजी महाराज आपले दैवत आहेत. सावित्रीबाई फुले असतील की आंबेडकर असतील, त्यांच्याबद्दल बोलण्याचे कुभांड कोणी काढलेय, त्याच्या मागचा मास्टरमाईंड कोण आहे? राज्यपाल झाले की त्यांचे मंत्री बोलतायत, दुसरे मंत्री बोलतायत, कोणी भीक मागायला असे बोलतायत, असे अजित पवार म्हणाले.
मधल्या काळात पुणे बंद होते, सोलापूर बंद होते. कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे. आज जो विराच मोर्चा निघालाय त्यामुळे राज्यकर्त्यांना धडकी भरेल. राज्यपालांना हटविले गेले पाहिजे. पुन्हा अशाप्रकारची पुनरावृत्ती होणार नाही हे पाहिले पाहिजे. विधानसभा अधिवेशनात त्यासाठी कायदा आणा आम्ही त्याला पाठिंबा देऊ, अशी मागणी मी करत आहे, असे पवार म्हणाले.
01:29 PM
शरद पवार व्यासपीठावर दाखल.
महाविकास आघाडीचा मोर्चा सभास्थळी पोहोचल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दाखल. नेत्यांची भाषणे सुरु.
01:27 PM
राज्यपालांना पदावर बसण्याचा अधिकार राहिलेला नाही. - राऊत
राज्यपालांना पदावर बसण्याचा अधिकार राहिलेला नाही. सरकार उलथवण्यासाठी हा इशारा दिलेला आहे. दिल्लीही आज दुर्बीनीतून पाहत असेल महाराष्ट्राची ताकद काय आहे. आज संपूर्ण महाराष्ट्राचा रंग एकत्र आला आहे. रावन गाडण्यासाठी आणला आहे. कर्नाटकचा मुख्यमंत्री बोम्मई, अरे आमच्या ताब्यात द्या त्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जमत नसेल तर. सरकार लटपटायला लागले आहे. आम्ही एकत्र आहोत, महाराष्ट्र एक आहे. ते सांगण्यासाठी एकत्र जमलो आहोत.
01:23 PM
सरकार उलथवून टाकण्यासाठी टाकलेले पहिले पाऊल - संजय राऊत
आज संपूर्ण महाराष्ट्राचा रंग एकत्र आला आहे. रावन गाडण्यासाठी आणला आहे. कर्नाटकचा मुख्यमंत्री बोम्मई, अरे आमच्या ताब्यात द्या त्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जमत नसेल तर. सरकार लटपटायला लागले आहे. आम्ही एकत्र आहोत, महाराष्ट्र एक आहे. ते सांगण्यासाठी एकत्र जमलो आहोत.
01:17 PM
नेते पोहोचले, पण कार्यकर्ते अद्यापही रस्त्यावरच...
नेते व्यासपीठावर पोहोचले तरी मोर्चेकरी कार्यकर्ते अद्याप मोठ्या रांगेत रस्त्यावर. त्यांना सभास्थळी पोहोचणे गर्दीमुळे अशक्य.
01:11 PM
महामोर्चाचे सभास्थळी स्वागत
महामोर्चा सभास्थळी पोहोचला. सर्व नेते काहीच वेळात व्यासपीठावर येणार.
12:52 PM
राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार महामोर्चात सहभागी
राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार महामोर्चात सहभागी झाले आहेत. उद्धव ठाकरे, पवार, नाना पटोले एकत्र. रश्मी ठाकरे, सुप्रिया सुळे महिलांच्या आघाडीकडे.
#WATCH | Shiv Sena leader Uddhav Thackeray and NCP leader Ajit Pawar join protest march by Maharashtra Vikas Aghadi (MVA) in Mumbai against the state government and Governor BS Koshyari over his controversial remark on Chhatrapati Shivaji Maharaj pic.twitter.com/iIFUtNiZPj
— ANI (@ANI) December 17, 2022
01:07 PM
एकटे लढू पण भाजपासोबत जाणार नाही - प्रकाश आंबेडकर
सीमावाद प्रकरणी राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोषी; एकटे लढू पण भाजपासोबत जाणार नाही. अविकसित गावे आता शिवसेनेवर आरोप करण्याची शक्यता. राष्ट्रवादीचे शिंतोडे शिवसेना आपल्यावर का उडवून घेत आहे? - प्रकाश आंबेडकर.
12:29 PM
महामोर्चा निघाला! उद्धव ठाकरे सहकुटुंब सहभागी; रश्मी ठाकरे पहिल्यांदाच मोर्चामध्ये...
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे महामोर्चात सहभागी झाले आहेत. जेजे उड्डाणपुलावरून ते मोर्चेकऱ्यांसोबत चालत आहेत.
12:15 PM
महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते महामोर्चात; बेळगावप्रश्नावर पाठिंबा...
गेल्या ६६ वर्षांपासून आम्ही लढा देत आहोत. उद्धव ठाकरेंनी बेळगावची बाजू घेतलेली आहे. आम्हाला आमचा प्रश्न सुटला पाहिजे, आमची मागणी प्रामुख्याने घेतली गेली. कोणावर आरोप करायचे नाहीत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बरळत आहेत, असे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी म्हटले.
11:35 AM
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत मोर्चास्थळी. नेते पोहोचण्यास सुरुवात.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत मोर्चास्थळी. नेते पोहोचण्यास सुरुवात.
11:24 AM
महामोर्चाला निकाळजे आरपीआय गटाचा पाठिंबा.
महामोर्चाला निकाळजे आरपीआय गटाचा पाठिंबा.
11:05 AM
भाजपच्या मोर्च्याला महाराष्ट्राची जनता भीक घालणार नाही - आ. अमोल मिटकरी
भाजपच्या मोर्च्याला महाराष्ट्राची जनता भीक घालणार नाही - आ. अमोल मिटकरी
*भाजपाच्या मोर्चाला महाराष्ट्रातील जनता भीक घालणार नाही!" - @amolmitkari22#Mumbai#MumbaiMorcha#MVAMorcha#MahaMorchapic.twitter.com/SAj6XFls21
— Lokmat (@lokmat) December 17, 2022
11:23 AM
पुण्यातही भाजपाचे आंदोलन
पुण्यात पाकिस्तानचे मंत्री बिलावल भुट्टोंविरोधात भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचे आंदोलन. राज्यभरात माफी मांगो आंदोलन करण्यात येणार.
11:06 AM
डोंबिवलीत बंदला संमिश्र प्रतिसाद; काही दुकाने उघडी तर काही दुकाने बंद
डोंबिवलीत बंदला संमिश्र प्रतिसाद; काही दुकाने उघडी तर काही दुकाने बंद
11:05 AM
या मोर्च्यामध्ये महाराष्ट्रातील लोकांचा रोष व्यक्त होत आहे - माजी महापौर किशोरी पेडणेकर
या मोर्च्यामध्ये महाराष्ट्रातील लोकांचा रोष व्यक्त होत आहे - माजी महापौर किशोरी पेडणेकर
11:05 AM
भाजपचा मोर्चा हा फक्त राजकारण आहे - आ. रोहित पवार
भाजपचा मोर्चा हा फक्त राजकारण आहे - आ. रोहित पवार
11:02 AM
ठाणे: अचानक परिवहन सेवा बंद केल्यामुळे प्रवाशांचे हाल
हिंदुत्ववादी संघटनांनी आज ठाणे बंदची हाक दिल्यानंतर ठाण्यातील परिवहन सेवा करण्यात आली बंद. सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात पुकारलाय ठाणे बंद
10:47 AM
मोर्चात कशाला आलोय? अनेक महिलांना मोर्चाचे कारणच माहिती नाही...
10:45 AM
महामोर्चा: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त
महामोर्चा: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त
10:30 AM
ठाणे बंद, आंदोलन काय करताय, शिवरायांच्या अपमानावरती महाराष्ट्र बंद करायला हवा होता : संजय राऊत
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा व्यक्ती राजभवनात बसला आहे . यांचा मेंदू दिल्लीत गहाण ठेवला आहे . छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं बेताल वक्तव्य आजपर्यंत कोणी केलं नव्हतं. आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्र प्रेमाचा म्हणून हे काम आम्ही हाती घेतला आहे.तुम्ही नींदे आहात म्हणून तुम्ही हा सहन करत आहात, संजय राऊतांची टीका.
सरकारमध्ये कोणी महाराष्ट्र प्रेमी उरले असतील तर त्यांनी आमच्यात सामील व्हा - संजय राऊत. #Sanjay Raut #MahaMorcha#EknathShindepic.twitter.com/BUJqgLtP4x
— Lokmat (@lokmat) December 17, 2022
10:13 AM
ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे मोर्चा साठी रेल्वे ने मुंबई कडे निघाले
ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे मोर्चा साठी रेल्वे ने मुंबई कडे निघाले#RajanVichare#Shivsena#thane#MahaVikasAghadi#MahaMorchahttps://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/mgyw863png
— Lokmat (@lokmat) December 17, 2022
09:47 AM
...म्हणून शिंदे गटाने ठाणे बंद केला; खासदार राजन विचारे लोकलने निघाले
महामोर्चाला शिवसैनिक, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जाऊ नयेत म्हणून शिंदे गटाने ठाणे बंद केला. - राजन विचारेंचा आरोप. मोर्चासाठी ट्रेनने निघाले.
09:46 AM
अजित पवार मोर्चास्थळी रवाना
अजित पवार मोर्चास्थळी रवाना
09:12 AM
अमित शहांनी शब्द दिल्याप्रमाणे सीमावादात हस्तक्षेप केला, पण... - सुप्रिया सुळे
अमित शहांनी शब्द दिल्याप्रमाणे सीमावादात हस्तक्षेप केला. परंतू राज्यपालांना हटविण्यासाठी कारवाई करावी, अशी मागणी होती. ती कारवाई केली जात नाहीय. महाराष्ट्राला कमीपणा कसा दाखविला जाईल, हे कृतीतून दिसते. - सुप्रिया सुळे.
09:02 AM
अशोक चव्हाण अनुपस्थित राहणार...
काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण मोर्चाला अनुपस्थित, निवकवर्तीयांच्या कार्यक्रमाचे कारण, पत्नी मोर्चात सहभागी होणार.
09:01 AM
कुडास कंपनीचे गेट उघडले
मविआच्या महामोर्चासाठी रिचर्डसन कुडास कंपनीचे गेट उघडले. कार्यकर्ते जमण्यास सुरुवात. सीएसटीला स्टेजही उभारण्यास सुरुवात.
08:38 AM
शरद पवारही येणार...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दुपारी साडे बारा वाजता सभास्थळी येणार. प्रकृतीच्या कारणास्तव मोर्चात सहभागी होण्यावर प्रश्नचिन्ह होते.
08:32 AM
मविआचे दीड लाख कार्यकर्ते येणार...
महाविकास आघाडीकडून मोर्चासाठी दीड लाख कार्यकर्ते येणार. उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले उपस्थित राहणार.
08:29 AM
अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा
महामोर्चा रिचर्डसन कुडास कंपनी, जे जे मार्ग ते आझाद मैदानपर्यंत जाणार आहे. त्यासाठी ३१७ पोलिस अधिकारी, १,८७० पोलिस अंमलदार, तसेच राज्य राखीव पोलिस बलाचे २२ प्लाटून, त्याप्रमाणे दंगल नियंत्रण पथक, अश्रूधूर पथक, सीसीटीव्ही व्हॅन, राखीव पथके असून, एकूण ३० पथके येथे तैनात राहणार आहेत, तसेच सायबर सेलही सर्व सोशल घडामोडींवर लक्ष ठेवून आहे.
08:28 AM
आजच्या मोर्चातील वाहने कुठे लावायची?
सकाळी १०.०० वा पासून खालील ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्लॅटफॉर्म क्र. १८ येथे ५० बससाठी पार्किंगची व्यवस्था आहे, बलार्ड इस्टेट येथे ५० बस, कर्नाक बंदर ते बीपीटी पे अँड पार्किंग ७० बस, कल्याण स्ट्रीट ५० बस, पी डीमेलो रोड ५० बस, भाऊचा धक्का ७० बस, बीपीटी पे अँड पार्क, कॉटन ग्रीन २०० बस, फॅशन स्ट्रीट ४० बस, टाटा पॉवर कंपनी १५० कार, मुंबई रेल्वे पोलिस आयुक्तालयासमोरील रस्ता येथे ४० बस पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
08:28 AM
कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी - फडणवीस
मोर्चा शांततेत व्हावा, त्याला परवानगी दिलेली आहे. लोकशाही पद्धतीने कोणाला विरोध करायचा असेल तर ते करतील. कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी, एवढ्यापुरता सरकारचा त्यात हस्तक्षेप असेल.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
08:27 AM
ड्रोनद्वारे ठेवणार लक्ष - पोलीस
या मोर्चासाठी दोन ते अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. राज्य राखीव पोलिस दलाच्या वाढीव तुकड्याही तैनात असतील. ड्रोनच्या माध्यमातून पोलिस मोर्चावर लक्ष ठेवणार आहेत.