माझी कृषी योजना : कृषी गणना योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 01:00 PM2018-12-29T13:00:11+5:302018-12-29T13:00:29+5:30

माहितीच्या आधारे भविष्यकाळात कृषीविषयक विश्वसनीय आकडेवारी गोळा करणे हे जागतिक अन्न व शेती संघटनेने पुरस्कृत केलेल्या कृषीगणनेचे उद्देश आहेत.

My Agriculture Plan : Agriculture Calculation Plan | माझी कृषी योजना : कृषी गणना योजना

माझी कृषी योजना : कृषी गणना योजना

googlenewsNext

देशाच्या शेतीविषयक प्रश्नांवर प्रकाश पडू शकेल, अशा सामाजिक व आर्थिक गोष्टींसंबंधी तसेच शेतजमिनींसंबंधी संपूर्ण माहिती संकलित करणे व त्यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास करणे. जमिनीचा वापर, पिकाखालचे क्षेत्र, पशुधन इत्यादी कृषीविषयक महत्त्वाची आकडेवारी गोळा करणे. सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीत सुधारणा करून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे भविष्यकाळात कृषीविषयक विकासाची वाढ मोजणे. कृषीगणनेच्या संदर्भात गोळा करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे भविष्यकाळात कृषीविषयक विश्वसनीय आकडेवारी गोळा करणे हे  जागतिक अन्न व शेती संघटनेने पुरस्कृत केलेल्या कृषीगणनेचे उद्देश आहेत.

शेतजमीन व शेतकरी, शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाची निरनिराळ्या वर्गांतील शेतकऱ्यांमध्ये झालेली विभागणी, शेतकऱ्यांचे व शेतीवर अवलंबून असणाऱ्यांचे जोडधंदे, पिकांखालील क्षेत्र व पिकांचे उत्पन्न, पशुधनापासून मिळणारे दूध, अंडी, मांस आदींबाबत सर्व आकलन याद्वारे केले जाते. यामाध्यमातून शेतीमध्ये आणखी काय बदल करायचे याचे विश्लेषण केले जाते.

Web Title: My Agriculture Plan : Agriculture Calculation Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.