माझी कृषी योजना : राजे होळकर महामेष योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:16 PM2019-01-05T12:16:19+5:302019-01-05T12:16:25+5:30

मेंढीपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी महामंडळाकडून राजे यशवंतराव होळकर महामेष योजना राबविली जाते.

My Agriculture Plan : Raje Holkar and Mahamesh Yojana | माझी कृषी योजना : राजे होळकर महामेष योजना

माझी कृषी योजना : राजे होळकर महामेष योजना

googlenewsNext

महाराष्ट्र राज्यात पूर्वी मेंढ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. कालांतराने ती कमी होत चालली आहे. याला अनेक कारणे असली, तरी राज्यात होणारी ही  घट थांबविण्यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळातर्फे यासाठी उपाययोजना राबविल्या जातात. यापैकीच मेंढीपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी महामंडळाकडून राजे यशवंतराव होळकर महामेष योजना राबविली जाते.

महामेष योजनेत सहा प्रमुख घटकांचा समावेश आहे. या योजनेनुसार लाभार्थ्याला वीस मेंढ्या व एक नर मेंढा वाटप करणे. मेंढीपालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान वाटप करणे. तसेच मेंढ्यांना खाद्य कमतरता पडू नये यासाठी हिरव्या चाऱ्याचा मुरघास बनविण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी अनुदान वाटप करण्याचे या योजनेत नियोजन आहे. ही योजना नव्याने मेंढीपालन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. या योजनेमुळे राज्यात मेंढीपालन व्यवसायाला प्रोत्साहन मिळणार आहे.

Web Title: My Agriculture Plan : Raje Holkar and Mahamesh Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.