माझी कृषी योजना : पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 11:42 AM2019-01-08T11:42:07+5:302019-01-08T11:43:34+5:30
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत ही योजना राबविली जाते.
पशुपालकांमध्ये पशूंचे संवर्धन व दुग्ध व्यवसायाबाबत जागरूकता निर्माण करून कौशल्य विकास वृद्धीसाठी सर्वसाधारण पशुपालकांना तसेच अनुसूचित जाती, नवबौद्ध लाभधारकांना पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायविषयक प्रशिक्षण योजना शासनातर्फे आणलेली आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत ही योजना राबविली जाते.
या योजनेचा प्रशिक्षण कालावधी तीन दिवसांचा आहे. योजनेंतर्गत प्रशिक्षणासाठी अर्जदारास जनावरांच्या प्रक्षेत्रावर, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, शेळी, मेंढी विकास महामंडळ, भारतीय कृषी औद्योगिक प्रतिष्ठान, कृषी व पशुवैद्यकीय महाविद्यालय याठिकाणी प्रशिक्षण दिले जाते. जर लाभार्थ्याला याठिकाणी प्रशिक्षण घेणे शक्य नसल्यास प्रशिक्षणार्र्थींना प्रक्षेत्रावरच प्रात्यक्षिक काम करावे लागेल.
प्रशिक्षणात गायी, म्हशीचे व्यवस्थापन, संकरित पैदाशीचे तंत्रज्ञान, ऋतुचक्र, कृत्रिम रेतन आदींबाबत प्रशिक्षण दिले जाते. लाभार्र्थींना ग्रामपंचायतीची शिफारस आवश्यक राहील. जातीच्या दाखल्याची प्रत, आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. प्रशिक्षण कालावधीचा खर्च शासनाकडून केला जातो.