माझी कृषी योजना : डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:33 AM2018-10-23T11:33:43+5:302018-10-23T11:34:12+5:30
कृषी क्षेत्रात संघटनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तीला किंवा गटाला किंवा संस्थेला पुरस्कारासाठी प्राधान्य दिले जाते.
कृषी क्षेत्रात संघटनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तीला किंवा गटाला किंवा संस्थेला पुरस्कारासाठी प्राधान्य दिले जाते. प्रास्तावित गटाने किंवा संस्थेने केलेले कार्य संपूर्ण राज्याला दिशादर्शक असावे, शासकीय किंवा शासन अंगीकृत व सहकार संस्था (उदा. स्थानिक स्वराज्य संस्था, कृषी विद्यापीठे) यांच्या आस्थापनेवर काम करणारे किंवा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र नसतात.
तसेच केंद्र शासनाकडून किंवा राज्य शासनाकडून किंवा अंगीकृत संस्थेकडून कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेणारी संस्था किवा व्यक्ती पुरस्कारासाठी पात्र नसतात. संबंधिताने पूर्वी घेतलेल्या पुरस्काराचा तपशील, तसेच कृषी विभागाकडून किंवा इतर विभागाकडून मिळालेल्या पुरस्काराचा तपशील प्रमाणपत्रासह सादर करणे आवश्यक आहे.
संबंधित शेतकऱ्यांचे ई-मेल, वेबसाईट इत्यादी बाबींचा समावेश करून त्याचे कार्य व कार्यक्षेत्र याचा उल्लेख करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा आधार कार्ड नंबर व बँकेचा खाते क्रमांक यांसह त्यांची पार्श्वभूमी, शिक्षण केलेले कार्य त्यामुळे इतर शेतकऱ्यांना झालेला फायदा, याची माहितीही देणे आवश्यक आहे.