माझी कृषी योजना : प्लास्टिक मल्चिंग पेपर योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:27 PM2018-12-24T12:27:14+5:302018-12-24T12:28:10+5:30

बाष्पीभवन थांबवून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर होणारा ऱ्हास टाळता येतो.

My Agriculture Scheme : Plastics Mallching Paper Scheme | माझी कृषी योजना : प्लास्टिक मल्चिंग पेपर योजना

माझी कृषी योजना : प्लास्टिक मल्चिंग पेपर योजना

googlenewsNext

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनातर्फे वेळोवेळी प्रयत्न सुरू असतात. याचाच एक भाग म्हणून शासनाने शेतकऱ्यांसाठी प्लास्टिक मल्चिंग पेपर योजना आणलेली आहे. 

फळझाडे, भाजीपाला तसेच इतर विविध पिकांच्या सभोवती, जमिनीवर मल्चिंगसाठी तयार केलेली प्लास्टिकची फिल्म वापरल्यावर पाण्याचे बाष्पीभवन थांबवून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर होणारा ऱ्हास टाळता येतो. तसेच झाडे किंवा रोपट्यांच्या सभोवती होणारी तणांची वारेमाप वाढ याद्वारे रोखता येते. या योजनेचा लाभ वैयक्तिक शेतकरी, शेतकऱ्यांचा समूह, शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या, बचत गट, सहकारी संस्था घेऊ शकतात. 

अनुसूचित जातींना १६ टक्के, अनुसूचित जमातींना ८ टक्के व आदिवासी महिलांना ३० टक्के, तसेच लहान शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जातो. यासाठी शासनातर्फे अर्थसहाय्य केले जाते. लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर शेती असणे आवश्यक आहे. भाजीपाला लागवडीखालील शेती व जमीन आणि त्याचा सातबारा आवश्यक आहे.

Web Title: My Agriculture Scheme : Plastics Mallching Paper Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.