माझी कृषी योजना : बियाणे व लागवड साहित्य योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:42 PM2018-12-15T12:42:24+5:302018-12-15T12:42:58+5:30
दर्जेदार बियाण्यांची उपलब्धता होण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही योजना राबविण्यात येत आहे.
राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियान (एनएमऐईटी) या केंद्र पुरस्कृत अभियानांतर्गत बियाणे व लागवड साहित्य उपअभियान (एसएमएसपी) ही योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत बियाणे तपासणी प्रयोगशाळा सुधारणे. बियाणे उत्पादन संस्थांना नवीन बियाणे उत्पादन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी साह्य करणे. यासाठी दर्जेदार किंवा प्रमाणित बियाण्यांच्या उत्पादकतेमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा समावेश करून सध्या अस्तित्वात असलेली योजना एका अभियानाच्या स्वरूपात विस्तारित करण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांना वाजवी दरामध्ये व ठराविक वेळेत दर्जेदार बियाण्यांची उपलब्धता होण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेमध्ये शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे पुरवठा करण्यासाठी केंद्रवर्ती बियाणे उत्पादन करण्यापासून ते बियाणे क्षेत्राच्या विकासासाठी हितावह पायाभूत सुविधा निर्माण करण्यास साह्य करणे. नैसर्गिक आपत्तीवेळी बियाण्यांची गरज भागविण्यासाठी बियाणे बँकेत जमा करणे, आदी संपूर्ण बियाणे साखळी तयार करण्याचे यात नियोजन आहे.