माझी कृषी योजना : पॉलीहाऊस उभारण्यासाठी अनुदान योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 11:55 AM2019-01-03T11:55:04+5:302019-01-03T11:55:57+5:30
शेतीमध्ये पॉलीहाऊसद्वारे शेती करणे सर्वात आधुनिक म्हणून गणले जाते.
शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीकडे वळावे, याकरिता केंद्र, तसेच महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी नवनवीन योजना शेतकऱ्यांसाठी आणल्या जातात. जगात सध्या शेतीमध्ये पॉलीहाऊसद्वारे शेती करणे सर्वात आधुनिक म्हणून गणले जाते. विकसित देशांमध्ये जवळपास सर्वच शेतकरी पॉलीहाऊस शेती करतात. शासनाकडून आपल्या देशातही शेतकऱ्यांनी पॉलीहाऊस उभारण्यासाठी अनुदान दिले जाते.
राज्यात अनेक ठिकाणी पॉलीहाऊस, तसेच शेडनेटच्या माध्यमातून शेतकरी यशस्वीरीत्या शेती करीत आहेत. यात भाजीपाला, तसेच फुलशेती करण्याकडे शेतकऱ्यांचा विशेष कल असतो. या योजनेंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांना १००८ ते ४०८० चौ. मी. पॉलीहाऊस उभारण्याकरिता प्रकल्प खर्चाच्या पन्नास टक्के अथवा प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के यापैकी जे जास्त असेल तेवढे अनुदान दिले जाते, तसेच सर्वसाधारण पॉलीहाऊस ५६० ते ४०८० चौ. मी.पर्यंतसुद्धा प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के अथवा प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के अनुदान दिले जाते.