माझी कृषी योजना : व्हेंचर कॅपिटल अर्थसाह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 11:48 AM2018-10-30T11:48:17+5:302018-10-30T11:50:08+5:30
वित्तीय पुरवठ्यामधील तफावत दूर करणे, हे या योजनेचे ठळक वैशिट्ये आहे.
कृषी उद्योगामध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन व विक्रीची हमी देऊन त्याद्वारे ग्रामीण उत्पन्न व रोजगार वाढविणारे कृषी उत्पादन व प्रक्रिया ही साखळी मजबूत करणे, शेतकरी उत्पादक गट, कृषी पदवीधर यांचा सहभाग वाढविणे आणि कृषी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याच्या हेतूने कृषी उद्योजकांसाठी प्रशिक्षण व भेटी आयोजित करणे हा योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
या उद्योगास मुदत कर्ज मंजूर करणाऱ्या बँकांकडून प्रकल्प आयोजकास उपलब्ध होणाऱ्या वित्तीय पुरवठ्यामधील तफावत दूर करणे, हे या योजनेचे ठळक वैशिट्ये आहे. कृषीपूरक क्षेत्रतील किंवा कृषी सेवांशी संबंधित प्रकल्प ज्यांच्या उत्पादनास हमखास बाजारपेठ आहे तसेच शेतकऱ्यांना विविध उच्च मूल्यांकित पिके आणि त्यांचे उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन देणारे प्रस्तावित प्रकल्प आणि बँकेने मुदत कर्ज मंजूर करण्यासाठी स्वीकारलेले प्रकल्प हे या योजनेंतर्गत सुविधेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. याअंतर्गत मिळणारे अर्थसाह्य प्रकल्प खर्चावर अवलंबून आहे. या योजनेंतर्गत अधिकतम अर्थसाह्याची मर्यादा ही ५० लाखांपर्यंतच आहे.