माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोविडचा संसर्ग, मृत्यू दर कमी होईल - ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 06:36 AM2020-09-24T06:36:59+5:302020-09-24T06:37:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : माझे कुटुंब, माझी जबाबदारीसारख्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून त्याचा ...

My family, my responsibility campaign will reduce Kovid's infection, death rate - Thackeray | माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोविडचा संसर्ग, मृत्यू दर कमी होईल - ठाकरे

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोविडचा संसर्ग, मृत्यू दर कमी होईल - ठाकरे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माझे कुटुंब, माझी जबाबदारीसारख्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून त्याचा परिणाम येणाऱ्या काळात मृत्यू दर आणि कोविड पॉझिटिव्हिटी दर कमी झालेला दिसेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सांगितले. राज्यात सर्वत्र टेलीआयसीयू व्यवस्था उभारून ग्रामीण भागात वेळीच उपचार कसे मिळतील हे आम्ही पाहणार आहोत असेही ते म्हणाले. कोविडनंतर रुग्णांमध्ये वैद्यकीय उपचारांची गरज असून उपचार केंद्रे सुरु करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली.


आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला ,त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब , तामिळनाडू या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी देखील बैठकीत सहभाग घेतला. 

पथकांनी २६ टक्के
घरांना भेटी दिल्या

माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान राबवण्यासाठी राज्यात ५५ हजार पथके तयार करण्याचे निश्चित केले होते. मात्र त्यापेक्षा जास्त म्हणजे ५९ हजार पथके सध्या तैनात आहेत. ही पथके राज्यातील २६ टक्के घरांपर्यत पोहोचली असून ७० लाख ७५,७८२ घरांना भेटी दिल्या देऊन २.८३ लाख लोकांचे आरोग्य सर्व्हेक्षण पूर्ण केले. त्या पाहणीत ४८२४ कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती तसेच ७ लाख ५४ हजार कोमॉर्बिड लोक आढळले.


महाराष्ट्र के लोग
बहादूर- पंतप्रधान

यावेळी पंतप्रधानांनी देखील महाराष्ट्र के लोग बहादुरीसे सामना करते है असे सांगून कोविडचा संसर्ग जास्त असलेल्या महाराष्ट्रातल्या २० जिल्ह्यात विशेष समर्पित पथके नियुक्त करून संसर्ग कमी केल्यास देशाच्या कोरोना आकडेवारीवर परिणाम होईल अशी सूचना केली.


दररोज दीड लाखापर्यंत चाचण्या वाढविणार
राज्यात दररोज दीड लाखापर्यंत चाचण्या वाढवीत आहोत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच प्रायोगिक तत्वावर टेलीआयसीयू व्यवस्था सुरु केली असून येणाºया काळात राज्यभर ही यंत्रणा उभारून विशेषत: ग्रामीण व दुर्गम भागात शहरातील तज्ञ डॉक्टर्सचे उपचारांसाठी मार्गदर्शन घेण्याचे आम्ही ठरविले आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: My family, my responsibility campaign will reduce Kovid's infection, death rate - Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.