‘माझ्या मित्राच्या बॅगेत बॉम्ब आहे...’
By admin | Published: March 5, 2017 02:09 AM2017-03-05T02:09:00+5:302017-03-05T02:09:00+5:30
‘माझ्या मित्राच्या बॅगेत बॉम्ब आहे, त्याची नीट झडती घ्या...’ अशी मस्करी दिल्लीला जाण्यासाठी निघालेल्या एका मॉडेलने विमानतळावर केली. मात्र, ही मस्करी तिला
मुंबई : ‘माझ्या मित्राच्या बॅगेत बॉम्ब आहे, त्याची नीट झडती घ्या...’ अशी मस्करी दिल्लीला जाण्यासाठी निघालेल्या एका मॉडेलने विमानतळावर केली. मात्र, ही मस्करी तिला चांगलीच महागात पडली. गुरुवारी घडलेल्या या घटनेमुळे विमानतळावर तासभर तणावाचे वातावरण होते. या प्रकरणी सहार पोलिसांनी तिला अटक केली आहे.
गुरुवारी रात्री ठाकूर ८च्या सुमारास एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीला निघाली होती. त्या वेळी तिच्यासोबत तिचे मित्र होते. साहित्याची तपासणी करताना मित्राच्या बॅगेचीही नीट झडती घ्या, असे तिने सुरक्षारक्षकांना सांगितले. सुरुवातीला त्यांनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, ती वारंवार मित्राची बॅग तपासण्याची विनंती करू लागली. त्यांच्या बागेत बॉम्ब असल्याचे तिने तेथील सुरक्षारक्षकांना सांगितले, तेव्हा केंद्रीय औद्योगिक बलाच्या जवानांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आले.
पोलिसांकडून शोधमोहीम सुरू झाली. मात्र, वातावरणातही तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच, जवळपास तासभराने ‘मी मस्करी करत होते,’ असे ठाकूरने अधिकाऱ्यांना सांगितले. सर्वांनीच सुटेकचा निश्वास सोडला. मात्र, या प्रकारामुळे तपास यंत्रणेची दमछाक झाली. त्यांनी याची माहिती सहार पोलिसांना दिली. पोलिसांनी ठाकुरवर गुन्हा दाखल करत तिला अटक केली. त्यानंतर, जामिनावर तिची मुक्तता करण्यात आली. (प्रतिनिधी)
घटनाक्रम
गुरुवारी रात्री ८ वाजता : कांचन ठाकूर मित्रांसोबत विमानतळावरील बोर्डिंग गेटवर दाखल.
रात्री ८.३० : तेथील सुरक्षा रक्षकांना मित्रांच्या बॅगेत बॉम्ब असल्याची माहिती दिली.
रात्री १० : या घटनेमुळे दिल्ली येथे जाणारे एअर इंडियाच्या विमानाच्या उड्डाणास एक तास उशीर झाला.
शुक्रवारी पहाटे १ : सीआयएफएस यांनी बॅगेची झडती घेतली, तेव्हा त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.
पहाटे १.३० : ठाकुर आणि तिच्या मित्रांना सहार पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
पहाटे ४.३० : ठाकुरविररुद्ध गुन्हा दाखल. मात्र, या वेळी सूर्योदयाआधी तिला अटक करणे शक्य नसल्याने तिला सकाळी हजर होण्यास सांगितले.
सकाळी १० : ठाकुर मित्रांसोबत पोलीस ठाण्यात मित्रांसोबत हजर झाली.
सकाळी १०.३० : ठाकुरला अटक केली आणि जामिनावर सुटका.