माझे आजोबाच गेले जणू !

By admin | Published: December 31, 2015 04:18 AM2015-12-31T04:18:07+5:302015-12-31T04:18:07+5:30

या कवितांमधून कविता लिहायची, वाचायची, समजून घ्यायची असं सगळंच पाडगावकरांनी शिकवलं. पाडगावकरांनी श्रावणाचे केलेले वर्णन दुसरं कुणीच करू शकत नाही. ‘असा बेभान हा वारा..’ हे शब्द

My grandfather was asleep! | माझे आजोबाच गेले जणू !

माझे आजोबाच गेले जणू !

Next

- संदीप खरे, कवी

या कवितांमधून कविता लिहायची, वाचायची, समजून घ्यायची असं सगळंच पाडगावकरांनी शिकवलं. पाडगावकरांनी श्रावणाचे केलेले वर्णन दुसरं कुणीच करू शकत नाही. ‘असा बेभान हा वारा..’ हे शब्द उच्चारल्यावरच बेभान झालेल्या वाऱ्याची झुळूक अनुभवल्याचा भास होतो. ही पाडगावकरांच्या शब्दांची ताकद आहे, त्यातला जिवंतपणा अमर आहे. पाडगावकरांचे केवळ साहित्यच नाही, तर माणूस म्हणून आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, विचार करण्याची पद्धत, आत्मपरीक्षण हे सगळंच पाडगावकरांनी शिकवलंय. ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं..’ या कवितेवरून ‘लव्हलेटर..’ हे विडंबन काव्य लिहिलं. त्यांच्याप्रमाणे सादर करण्याचा छोटासा प्रयत्नही केला. त्या कवितेला दाद मिळाली, पण ती कविता सादर करताना प्रत्येक क्षणी मला आणि श्रोत्यांनाही पाडगावकर आठवल्याशिवाय राहिले नाहीत. पाडगावकर आपल्यात नाहीत, यावर विश्वास बसणं कठीण आहे, या क्षणी माझेच आजोबा गेले, अशा भावनेने मी व्याकूळ झालो आहे.

Web Title: My grandfather was asleep!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.