‘माझा राजा हेलिकॉप्टरमध्ये अडकला!’

By admin | Published: May 26, 2017 05:23 AM2017-05-26T05:23:34+5:302017-05-26T05:23:34+5:30

हेलिकॉप्टरच्या अपघातानंतर त्याचा स्फोट होईल या भीतीने सरकारी यंत्रणेसह लोक मिळेल त्या वाटेने पळ काढत होते. मात्र भंगारच्या दुकानात थांबलेल्या २८ वर्षांच्या इरफान

'My King Is Stuck In a Helicopter!' | ‘माझा राजा हेलिकॉप्टरमध्ये अडकला!’

‘माझा राजा हेलिकॉप्टरमध्ये अडकला!’

Next

गोविंद इंगळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
निलंगा (लातूर) : हेलिकॉप्टरच्या अपघातानंतर त्याचा स्फोट होईल या भीतीने सरकारी यंत्रणेसह लोक मिळेल त्या वाटेने पळ काढत होते. मात्र भंगारच्या दुकानात थांबलेल्या २८ वर्षांच्या इरफान शेखने ‘माझा राजा हेलिकॉप्टरमध्ये अडकला,’ अशी आरोळी ठोकली. तो मुख्यमंत्र्यांच्या मदतीसाठी धावला अन् त्याने मुख्यमंत्र्यांना बाहेर काढले.
अपघातानंतर लोक वाट मिळेल तिकडे पळत होते. पण इरफान धाडस दाखवून मुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावला. ‘हमारा राजा अंदर अटका है’ म्हणत हेलिकॉप्टरजवळ जाऊन त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. आतून मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला, तेव्हा इरफानने बाहेरून दरवाजा ओढून काढला. मुख्यमंत्र्यांचा हात धरून त्यांना बाहेर घेतले. मुख्यमंत्री इरफानला म्हणाले, ‘मी फिट आहे, ओके आहे, पायलट व इतरांना बाहेर काढा’. त्यानंतर ते डीपीच्या बाजूला जाऊन थांबले. तेवढ्यात अनेक अधिकारी धावून मुख्यमंत्र्यांजवळ आले. अ‍ॅम्ब्युलन्स व अग्निशमन दलाचे बंबही घटनास्थळी दाखल झाले. मुख्यमंत्री अ‍ॅम्ब्युलन्समधून पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकरांच्या घराकडे रवाना झाले.
स्वत:च्या भंगारच्या दुकानात हेलिकॉप्टरच्या उड्डाणाकडेच मी पाहत थांबलो होतो. काही कळायच्या आतच हेलिकॉप्टर कोसळले. स्फोट होईल या भीतीने लोक सैरावैरा पळाले असले, तरी माझ्या मनात ती शंका आली नाही. उलट माझ्या मनात हेलिकॉप्टरमधील मुख्यमंत्री साहेब आणि अन्य अधिकाऱ्यांना कसे बाहेर काढता येईल, हाच विचार क्षणार्धात आला आणि मी हेलिकॉप्टरकडे धावत गेलो, असे इरफान याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: 'My King Is Stuck In a Helicopter!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.