‘माझा पिंगा, घालितो धिंगा’
By Admin | Published: February 5, 2017 12:56 AM2017-02-05T00:56:58+5:302017-02-05T00:56:58+5:30
वारी, पालखी सोहळा, कीर्तन-भजन, हरीनाम सप्ताह ही महाराष्ट्रातील भक्तीधारेची ओळख आहे. पालखी सोहळ्यात किंवा हरीनाम सप्ताहामध्ये वारकऱ्यांचा शीण घालविण्यासाठी सु
- ब्रम्हानंद जाधव, बुलडाणा
वारी, पालखी सोहळा, कीर्तन-भजन, हरीनाम सप्ताह ही महाराष्ट्रातील भक्तीधारेची ओळख आहे. पालखी सोहळ्यात किंवा हरीनाम सप्ताहामध्ये वारकऱ्यांचा शीण घालविण्यासाठी सुरू केलेला पाऊलीतील पिंगा हा प्रकार सर्वांत अवघड आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथील
प्रणव अवतार महोत्सवात ‘माझा पिंगा, घालितो धिंगा’ या भजनाच्या ठेक्यावर
हा समृद्ध भक्तीपरंपरेतील वारसा जपला आहे.
वारकरी परंपरेमध्ये मनाला व शरीराला रीझविणारे पाऊली, सोंगी भारूडे, रिंगण, फुगडी, लंगडी, पिंगा, हमामा, हुतूतू यांसारख्या खेळांचा अंतर्भावही केला जातो. भगवान कृष्णाने यमुनेच्या वाळवंटात खेळलेल्या आणि संतांनी पंढरीच्या वाळवंटात खेळलेल्या या खेळांना त्यामुळेच भक्तीचा दर्जा आहे. बालकांपासून वृद्धांपर्यंत असलेल्या या पाऊली खेळाच्या आकर्षणामुळेच अबोध बालकाचेही मानस भक्तीभावनेशी जोडले जाते. दीडशे वर्षांपूर्वी विदर्भात वारकरी भक्तीपंरपरा रुजविणारे संत बाळाभाऊ महाराजांच्या महोत्सवामध्ये ‘माझा पिंगा, घालितो धिंगा’ हा पाऊली प्रकार जपला जात आहे.
पिंगा प्रकार जीवंत ठेवण्यासाठी धडपड
भक्तीपरंपरेमधील पाऊलीतील पिंगा हा प्रकार अवघड असल्याने तो जीवंत ठेवण्यासाठी मेहकर येथील प्रा. श्रीहरी पितळे हे प्रयत्न करीत आहेत. प्रा. श्रीहरी पितळे हे हरिनाम सप्ताह, प्रणव अवतार महोत्सव, दिंडी परिक्रमा आदी
कार्यक्रमांत मुलांना पिंगा हा प्रकार शिकवित असतात.