माझी योजना : गटशेतीस चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 11:45 AM2018-10-09T11:45:55+5:302018-10-09T11:47:00+5:30

या योजनेंतर्गत मंजूर गट शेती योजनेतून देय अर्थसाह्य प्रकल्प खर्चाच्या ६० टक्के किंवा १ कोटी राहील.

My plan: advantages to group farming | माझी योजना : गटशेतीस चालना

माझी योजना : गटशेतीस चालना

googlenewsNext

एकाच समूहातील  शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शिवारातील संलग्न भौगौलिक क्षेत्रामध्ये सामूहिकरीत्या नियोजनबद्ध शेती करणे, शेती उत्पादनावर प्रक्रिया व मूल्यवर्धन करणे, एकत्रित विपणन करणे यासाठी सामूहिक स्वरूपाची व्यवस्था निर्माण करणे, शेती या व्यावसायिक जीवन पद्धतीद्वारे स्तव:ची, समूहाची उन्नती व विकास घडवून आणण्याच्या प्रक्रियेसाठी ही योजना लागू करण्यात आली.

या योजनेंतर्गत सहभागी होण्यासाठी नोंदणीकृत गट/ समूहांना संधी उपलब्ध राहील. त्यासाठी सहभागी शेतकऱ्यांच्या गटाची नोंदणी आत्मा संस्थेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी शेतकरी गटाच्या सर्व सदस्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करणे अनिवार्य राहील. या योजनेंतर्गत मंजूर गट शेती योजनेतून देय अर्थसाह्य प्रकल्प खर्चाच्या ६० टक्के किंवा १ कोटी राहील. गटांना अनुदान प्रचलित इतर योजनांमधून मिळणाऱ्या अर्थसाह्याव्यतिरिक्त राहील. योजनेच्या निकषाप्रमाणे शेतकरी गटाला संबंधित योजनेतून वैयक्तिक व सामुदायिक अनुदान देय राहील. अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: My plan: advantages to group farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.