माझी योजना : राष्ट्रीय कृषी विकास योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 11:35 AM2018-10-08T11:35:36+5:302018-10-08T11:37:05+5:30
यानुसार शासनाने औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., औरंगाबादला पेढा, पनीर, आइस्क्रीमच्या निर्मितीच्या प्रस्तावास मान्यता दिली.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास गांधेली येथील मुख्य डेअरी विस्तारीकरण व अत्याधुनिकीकरण करणे व भवन, सिल्लोड येथे शीतकरण केंद्राची उभारणी करण्याच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पास राकृवियो हिश्श्यापोटी १०.२७ कोटी रुपये मंजूर झाले.
आयुक्त, दुग्ध व्यवसाय विकास यांनी यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. बांधकाम व यंत्रसामग्री याबाबतची संपूर्ण प्रक्रिया ई-निविदा पद्धतीने झाल्याने मूळ प्रस्तावातील काही घटकांत ६ कोटी २४ लाख ३३ हजार ६८७ रुपयांची बचत झाली. याशिवाय काही घटकांमध्ये रुपये २ कोटी, ७३ लाख ८४ हजार २२१ ने वाढ झाली.
सदर बचत व वाढीमुळे प्रकल्प अंमलबजावणीमध्ये ३ कोटी ५० लाख ४९ हजार ४६६ रुपयांची बचत झाल्याने बचतीमधून संघाने पेढा, पनीर, आइस्क्रीम या उपपदार्थांच्या प्रकल्प उभारणीसाठी घटक बदलीचा प्रस्ताव आयुक्तांनी सादर केला होता. यानुसार शासनाने औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., औरंगाबादला पेढा, पनीर, आइस्क्रीमच्या निर्मितीच्या प्रस्तावास मान्यता दिली.