माझी योजना : परंपरागत कृषी विकास योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:02 PM2018-10-20T12:02:58+5:302018-10-20T12:03:53+5:30
मिनीचा पोत सुधारावा आणि उत्पादित मालाची प्रत सुधारावी यासाठी सेंद्रीय शेतीच्या विकासावर भर देण्यात आला आहे.
शेतीतील रासायनिक खते आणि किटक नाशकांचा वापर कमी करुन जमिनीचा पोत सुधारावा आणि उत्पादित मालाची प्रत सुधारावी यासाठी सेंद्रीय शेतीच्या विकासावर भर देण्यात आला आहे. योजनेचा उद्देश. हया योजनेतून पीजीएस प्रणाली पध्दतीने सेंद्रीय शेती करुन तिचे प्रमाणीकरण करणे तसेच सेंद्रीय शेतीसाठी सेंद्रीय गट निर्मिती करणे व ग्राहकास विषमुक्त सेंद्रीय शेती उत्पादने उपलब्ध करुन देणे, शेतक-यांचा उत्पादन खर्च कमी करणे, शेतक-यांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे व जमिनीचा पोत सुधारणे इत्यादी सेंद्रीय शेतीचे मुख्य उद्देश आहेत.
गटामध्ये भाग घेणा-या शेतक-याने तीन वर्षे सेंद्रीय शेती योजनेत भाग घेणे बंधनकारक राहील. एक शेतक-यास १ एकर व जास्तीत जास्त २.५ एकर पर्यत लाभ घेता येईल. रासायनिक कीटकनाशके, रासायनिक खते वापरणार नाही असे प्रतिज्ञापत्र शेतक-यांनी लिहून देणे बंधनकारक आहे, यापूर्वी सेंद्रीय शेती कार्यक्रमात भाग घेतलेल्या शेतक-यांना प्राधान्य दिले जाते, गटात समाविष्ट होणा-या शेतक-याकडे किमान दोन पशुधन असावे, शेतक-याकडे बँक खाते आवश्यक आहे.