मधमाशांपासून बचाव करताना तलावात बुडून मायलेकाचा मृत्यू
By Admin | Published: August 23, 2016 03:23 PM2016-08-23T15:23:38+5:302016-08-23T15:23:38+5:30
मधमाशांपासून बचावासाठी तलावात उडी घेतलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली.
style="font-family: HelveticaNeue, "Helvetica Neue", Helvetica, Arial, "Lucida Grande", sans-serif; font-size: 16px;">
ऑनलाइन लोकमत
कळंब (यवतमाळ), दि. २३ - मधमाशांपासून बचावासाठी तलावात उडी घेतलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील नांझा येथे मंगळवारी दुपारी २ वाजता घडली. कांताबाई किसन मसराम (५५), श्याम किसन मसराम (३५) अशी मृतांची नावे आहेत. रामभाऊ देवबा मसराम (५०) हे जखमी झाले.
सदर तिघे शेतात खत देत होते. त्याचवेळी मधमाशांचा घोळका शेतात शिरला. तिघांवरही त्यांनी हल्ला चढविला. यातून सुटका करण्यासाठी रामभाऊ हा दूरवर जावून थांबला. मात्र कांताबाई आणि श्याम या दोघांनी शेतालगतच असलेल्या तलावात उडी घेतली. मात्र दोघेही गाळात फसल्याने मृत्यू पावले. जखमी रामभाऊला उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले आहे.