मायलेकीचा जळून मृत्यू

By admin | Published: July 12, 2014 01:40 AM2014-07-12T01:40:46+5:302014-07-12T01:55:19+5:30

बाळापूर येथील मोमीनपुरा भागातील एक विवाहिता व तिच्या दीड वर्षीय मुलीचा संशयास्पदरित्या जळून मृत्यू.

Myelaki burns death | मायलेकीचा जळून मृत्यू

मायलेकीचा जळून मृत्यू

Next

बाळापूर : येथील कासारखेड छोटा मोमीनपुरा भागातील एक विवाहिता व तिच्या दीड वर्षीय मुलीचा संशयास्पदरित्या जळून मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. ही घटना गुरुवार, १0 जुलैच्या रात्री उशीरा घडली. बाळापूर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची न नोंद केली आहे.
पोलिस सुत्रांनूसार, छोटा मोमीनपुरा भागातील शाहेदा बानो मो. जकारीया (२५) व तिची मुलगी आमेना मो. जकारीया (दिड वर्ष)यांचा राहत्या घरात रात्री ११.३0 ते १२ वाजताचे दरम्यान जळून मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी नोंद घेतली असून तपास सुरू केल आहे. दरम्यान, सासरच्या मंडळींनी आपली मुलगी व नातीची गळा दाबून हत्या केल्यानंतर जाळून टाकल्याचा आरोप केला आहे. त्यानूसार पोलिसांनी मृतक महिलेचा पती, सासरा, सासू यांना ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मृतक महिलेच्या माहेरकडील मंडळींच्या आरोपांनुसार, अकोला येथील फिरदोस कॉलनीतील रहीवासी तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात लिपिक पदावर कार्यरतर असलेल्या अब्दुल सत्तार यांची मुलगी शाहेदा बानो(२५) हिचा विवाह बाळापूर येथील मोहम्मद जकारीया मोहम्मद जाफर याच्यासोबत १८ मे २00९ रोजी झाला होता. विवाहाच्या दोन वर्षांनंतर त्यांना आमेना नावाची मुलगी झाली. दरम्यानच्या काळात सासरच्या मंडळींनी शाहेदाकडे माहेरून एक लाख रुपये आणण्याचा तगादा लावला होता. या कारणावरून तिचा शारीरिक व मानसिक छळही सुरू होता. दरम्यान गुरुवारी रात्री शाहेदा व मुलगी आमेना यांचा मृत्यू झाला.
शाहेदाच्या सासरच्या मंडळींनी आधी दोघांची गळा दाबून हत्या केली व नंतर त्यांना रॉकेल टाकून पेटवून दिले, असा आरोप शाहेदाचे वडील अब्दुल सत्तार यांनी केला आहे. अब्दुल सत्तार हे याबाबतची लेखी तक्रार पोलिसांत करणार आहेत.
याबाबत बाळापूरचे ठाणेदार सुनील सोळंके यांच्याशी संपर्क साधला असता यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू असून, मृतकांच्या शवविच्छेदन अहवालानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Myelaki burns death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.