‘किल्ली’ने उघडले आत्महत्येचे गूढ

By admin | Published: January 2, 2017 02:24 AM2017-01-02T02:24:55+5:302017-01-02T02:24:55+5:30

आॅफिसमध्ये झालेल्या वादावादीमधून एकाने रेल्वे रुळावर झोपून रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ४ आॅगस्ट रोजी शिवाजीनगर ते खडकी रेल्वे स्थानकांदरम्यान

Mysteries of suicide opened by 'Kelly' | ‘किल्ली’ने उघडले आत्महत्येचे गूढ

‘किल्ली’ने उघडले आत्महत्येचे गूढ

Next

पुणे : आॅफिसमध्ये झालेल्या वादावादीमधून एकाने रेल्वे रुळावर झोपून रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
४ आॅगस्ट रोजी शिवाजीनगर ते खडकी रेल्वे स्थानकांदरम्यान घडलेली ही घटना दुचाकीच्या किल्लीमुळे उघडकीस आणण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले. परंतु गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता झालेल्या मुलाचा शोध घेत असलेल्या वडिलांना मात्र धक्का बसला आहे.
अनिल ज्ञानदेव अवचर (वय २२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तुषार जोरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर अवचर (वय ४५, रा. मलठण, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. अनिल हा शरद कृषी कंपनीमध्ये सहायक म्हणून काम करीत होता. तर जोरी हा समन्वय अधिकारी म्हणून काम करतो. अनिल आणि तुषारमध्ये मासिके बांधण्याच्या कारणावरून वाद झाला झाला. वरिष्ठ निरीक्षक संजय सातव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ आॅगस्ट रोजी अनिलचा मृतदेह शिवाजीनगर ते खडकी रेल्वे स्थानकादरम्यान आढळून आला होता. रेल्वेखाली आल्याने त्याच्या मृतदेहाचे दोन तुकडे झालेले होते. त्या वेळी त्याची ओळख पटलेली नव्हती. पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्या अंगावरील पॅँटमध्ये पोलिसांना कोणतीही कागदपत्रे अथवा वस्तू आढळून आलेल्या नव्हत्या. परंतु एक चावीचा जुडगा मिळून आला होता.
याच कालावधीत अनिल घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली होती. तो कामावर जात नसल्याने कोणालाच काही सांगता येत नव्हते. शोध घेता घेता त्याचे नातेवाईक लोहमार्ग पोलिसांकडे गेले. त्या वेळी पोलिसांनी रजिस्टरमधील नोंदी त्याच्या वडिलांना दाखवल्या. अनिलच्या वयाशी मिळत्याजुळत्या एका तरुणाचा मृतदेह मिळाल्याच्या नोंदी रजिस्टरमध्ये होत्या. या नोंदीवरून त्याच्याकडे मिळालेल्या चाव्या घेऊन पोलिसांनी नातेवाईकांसह शरद कृषी कंपनीजवळ जाऊन पाहणी केली. तेथे बेवारस अवस्थेत पडलेल्या दुचाकीला ही चावी लावून पाहिली असता दुचाकीला चावी लागली. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना अनिल काम करीत असलेल्या कंपनीबाबत सांगितले. हा मृतदेह अनिलचाच असल्याची खात्री जवळपास पटली होती. पोलिसांनी कंपनीमध्ये जाऊन अनिल वापरत असलेल्या कपाटाला त्या जुडग्यातील चावी लावून पाहिली. त्या चावीने कपाट उघडल्यानंतर मात्र तो मृतदेह अनिलचाच असल्याचे निष्पन्न झाले. लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ कंपनीतील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. त्या वेळी दोन साक्षीदार महिलांनी घटनेच्या दिवशी अनिलची आणि जोरीची भांडणे झाल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे. जोरीकडेही याबाबत चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण आठ जबाब नोंदवण्यात आले आहेत. अनिलच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी जोरीविरुद्ध गुन्हा दाखल करून हा गुन्हा शिवाजीनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Web Title: Mysteries of suicide opened by 'Kelly'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.