वाघांच्या चार बछड्यांचा गूढ मृत्यू

By admin | Published: December 28, 2015 04:12 AM2015-12-28T04:12:02+5:302015-12-28T04:13:59+5:30

दीड ते दोन महिन्यांपूर्वी बाळंत झालेल्या वाघिणीच्या चारही बछड्यांचा गूढ मृत्यू झाल्याची घटना पाथरी वनपरिक्षेत्रात रविवारी सकाळी उघडकीस आली. घटनास्थळ कोणाच्या हद्दीत येते,

Mysterious death of four tigers | वाघांच्या चार बछड्यांचा गूढ मृत्यू

वाघांच्या चार बछड्यांचा गूढ मृत्यू

Next

चंद्रपूर : दीड ते दोन महिन्यांपूर्वी बाळंत झालेल्या वाघिणीच्या चारही बछड्यांचा गूढ मृत्यू झाल्याची घटना पाथरी वनपरिक्षेत्रात रविवारी सकाळी उघडकीस आली. घटनास्थळ कोणाच्या हद्दीत येते, याबाबत अधिकाऱ्यांमध्ये समन्वय न झाल्याने ते उशिरा पोहोचले.
तीन बछड्यांचा जंगलात,
तर एकाचा दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. बछड्यांची आई
बेपत्ता असून, तिचा शोध घेण्यात येत आहे.
सावली तालुक्यातील वन विकास महामंडळाच्या पाथरी वनपरिक्षेत्रातील नवेगाव बिटमध्ये झालेल्या या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. मुनगंटीवार यांनी रविवारी दुपारी पशुवैद्यकीय रुग्णालयात जाऊन माहिती घेतली.
रविवारी सकाळी जंगलात सरपण आणण्यासाठी गेलेल्या महिलेला आसोला मेंढा तलावाच्या उपकालव्याजवळ बछडे मृतावस्थेत दिसून आले.
तिने घटनेची माहिती दिल्यावर तब्बल दोन तासांनी दोन
वनरक्षक घटनास्थळी आले;
तसेच त्यानंतर तब्बल एका तासाने अत्यवस्थ बछड्याला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले.
मात्र त्याचा रुग्णालयात मृत्यू
झाला. मृत बछड्यांपैकी दोन
नर, तर दोन मादी जातीचे होते. (प्रतिनिधी)
बछड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे आताच सांगता येणार नाही. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण कळू शकेल.
बेपत्ता वाघिणीचा शोध घेण्याचा
प्रयत्न सुरू आहे.
- आर.टी. धाबेकर, विभागीय अधिकारी (प्रादेशिक), वन विभाग

Web Title: Mysterious death of four tigers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.