इमारतीच्या गच्चीवरून पडून पोलिसाचा गूढ मृत्यू

By admin | Published: June 12, 2015 04:07 AM2015-06-12T04:07:39+5:302015-06-12T10:33:14+5:30

राहत्या इमारतीच्या गच्चीवरून पडून कासारवडवली ठाण्याचे पोलीस नाईक मोहन पाटील (४५) यांचा गुरु वारी पहाटे मृत्यू झाला.

The mysterious death of the police due to fall from the roof of the building | इमारतीच्या गच्चीवरून पडून पोलिसाचा गूढ मृत्यू

इमारतीच्या गच्चीवरून पडून पोलिसाचा गूढ मृत्यू

Next

ठाणे : राहत्या इमारतीच्या गच्चीवरून पडून कासारवडवली ठाण्याचे पोलीस नाईक मोहन पाटील (४५) यांचा गुरु वारी पहाटे मृत्यू झाला. पत्नीला सांगून गच्चीवर गेल्यानंतर १० ते १५ मिनिटांनी ते पडल्याने ही आत्महत्या की अपघाती मृत्यू, याचा शोध पोलीस घेत आहेत.
मोहन पाटील हे मूळचे जळगावचे. १९९१ साली पोलीस सेवेत भरती झाले. गेल्या एक वर्षांपासून ते क ासारवडवली पोलीस ठाण्यात होते. कोर्टनाका येथील न्यू ड्रायव्हर पोलीस लाइनमध्ये तिसऱ्या मजल्यावर ते कुटुंबीयांसह राहत. २९ मे पूर्वी ते पडल्याने त्यांचा चष्मा तुटला होता. तसेच हातालाही मार लागला होता. त्यामुळे ते तेव्हापासून सुटीवर होते. गुरुवारी पहाटे अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने पत्नीला सांगून ते गच्चीवर गेले. याचदरम्यान, ते खाली पडले. त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. चष्मा फुटल्याने पाटील हे गुरुवारीच तो बनविण्यासाठी जाणार होते. त्यांना गरगरत असे. त्यातूनच त्यांना चक्कर आली असावी, असे कुटुंबीयांचे म्हणणे असल्याचे पोलिसांनी सांगितले. पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांची दोन्ही मुले शिकत आहे. पाटील यांच्या पार्थिवावर त्यांच्या जळगावातील पिळोदे या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The mysterious death of the police due to fall from the roof of the building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.