एन. डी. पाटील यांच्यावर ह्रदयशस्त्रक्रिया
By admin | Published: January 7, 2015 01:49 AM2015-01-07T01:49:05+5:302015-01-07T01:49:05+5:30
शेतकरी व कष्टकरी जनतेचे लढवय्ये नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर मंगळवारी सकाळी मुंबईच्या वांद्रे येथील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये डॉ. रमाकांत पांडा यांनी बायपास हृदयशस्त्रक्रिया केली.
कोल्हापूर : शेतकरी व कष्टकरी जनतेचे लढवय्ये नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर मंगळवारी सकाळी मुंबईच्या वांद्रे येथील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये डॉ. रमाकांत पांडा यांनी बायपास हृदयशस्त्रक्रिया केली. त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून, प्रकृती सुधारत असल्याचे पत्नी सरोज पाटील यांनी सांगितले. एऩडी़ पाटील यांच्या हृदयाला शंभर टक्के दोन व नव्वद टक्क्यांचे तीन ब्लॉकेजेस होते.
त्यांना गेल्या आठवड्यापासून धाप लागत होती. जिने चढून गेल्यावर खूपच त्रास होत होता़ परंतु यापूर्वी त्यांनी कधीच हृदयरोगाची तपासणी केली नव्हती. त्यांना अलीकडील काही दिवसांत मधुमेहाचा त्रास होत होता. त्यामुळे त्याचाच हा परिणाम असावा असे त्यांना वाटत होते. त्यामुळे या त्रासाकडे दुर्लक्ष करून गेल्या आठवड्यात त्यांनी ऊस दरप्रश्नी सांगली जिल्'ांत बैठक घेतली व कारखानदारांना ५ जानेवारीची डेडलाईन दिली होती.
सोमवारी त्यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा होता. त्यास जाण्याची त्यांनी तयारी केली होती परंंतु तोपर्यंत शुक्रवारी त्रास वाढल्याने त्यांना
येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी एंजिओग्राफी केली असता पाच ब्लॉकेज आढळले. रविवारी दुपारी एअर अॅम्बुलन्सद्वारे त्यांना मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले़ त्यानंतर डॉ़ पांडा यांनी मंगळवारी एऩडी़पाटील यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया शस्त्रक्रिया केली़ (प्रतिनिधी)